तुमच्या पाया पडलो, तुम्ही उत्कृष्ट चित्रपटाकरता अभिनंदनही केले – शरद पवारांना विवेक अग्निहोत्रींनी करून दिली आठवण

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अजूनही संपलेला नाही. कश्मीर पंडितांवरील अत्याचार आणि त्यांचे पलायन या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. पण त्यावरून राजकारण सुरू झाले असून राजकारणी मंडळी त्याला धर्मिक रंग देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच एका मुलाखतीत या चित्रपटाविरोधात विधान केले. यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने टि्वट केले असून पवार यांना त्यांच्या विमानातील भेटीची आठवण करून दिली आहे.

या टि्वट मध्ये विवेक यांनी म्हटले आहे की या व्यक्तीचे नाव विवेक रंजन अग्निहोत्री आहे. काही दिवसांपूर्वी जो तुम्हांला विमानात भेटला होता. त्याने तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडत तुमचे आशिर्वाद घेतले. नंतर तुम्ही त्याला कश्मीरी हिंदू पंडीतांच्या नरसंहारावर उत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल अभिनंदन केले होते. असे टि्वट विवके अग्निहोत्रीने केले आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘द कश्मीर फाईल्सवर भाष्य केले. ते म्हणाले की एका माणसाने चित्रपट बनवला असून त्यात हिंदूवरील अत्याचार दाखवले आहेत. यात बहुसंख्य समाजाकडून नेहमीच अल्पसंख्याकावर अत्याचार होत असल्याचे दाखवले आहे. जेव्हा तो बहुसंख्याक समाज मुस्लीम असतो. यामुळे हिंदु असुरक्षित झालेत . पण हे दुर्देव आहे की सत्तेत असणारी माणसं याचा प्रचार करत आहेत.

पवारांच्या या विधानावरच विवेक यांनी टि्वट केले आहे. कारण पवार आणि अग्निहोत्री विमानात भेटले होते. तसेच पवार यांनी द कश्मीर फाईल्स मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले होते. मग असे असताना पवारांनी मुलाखतीत मात्र एका माणसाने चित्रपट बनवला असे विधान तर केलेच पण त्याचबरोबर चित्रपटाला विरोधही केला.