घरदेश-विदेशThe Kerala story: असदुद्दीन औवेसी म्हणाले, मोदी तर अभिनेते

The Kerala story: असदुद्दीन औवेसी म्हणाले, मोदी तर अभिनेते

Subscribe

 

कर्नाटकाः The Kerala story चित्रपटावरुन राजकीय कलगीतुरा रंगला आहे. दुसरीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रगड कमाई करत आहे. MIM प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे मोठे अभिनेते आहेत. मोदी बॉलिवूडमध्ये असते तर सर्व अभिनेते फिके पडले असते, अशी टीका औवेसी यांनी मोदी यांच्यावर केली आहे.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी The Kerala story चित्रपटाचे समर्थन केले. हा चित्रपट दहशतवादावर आधारित आहे. कॉंग्रेस दहशतवादावर आधारित चित्रपटाला विरोध करत आहे. मतांच्या गणितासाठी कॉंग्रेस दहशतवादाला पाठिंबा देत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी प्रचारात केला. या आरोपाला औवेसी यांनी चोख उत्तर दिले. देशात अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे दुर्लक्ष करत पंतप्रधान मोदी हे The Kerala story चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. मोदी हे मोठे अभिनेते आहेत. ते बॉलिवूडमध्ये असते तर सर्व अभिनेते फिके पडले असते, असा निशाणा औवेसी यांनी साधला.

हिटलरने ७० लाख ज्युंची हत्या केली. लोकांच्या मनात ज्युंविषयी नकारात्मक भावना निर्माण केली. हा इतिहास आपण विसरत आहोत. स्वतःच पोट भरण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून मुस्लिमांची प्रतिमा खराब करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप औवेसी यांनी केला.

- Advertisement -

या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुनच वाद निर्माण झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मात्र चित्रपटांमध्ये काम केलेल्या कलाकारांचा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे बाजारपेठेतून या चित्रपटावर जो विचार लोकं करतील तो करतील. त्यांनाच ठरवू द्या चित्रपटाविषयी, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे आणि ती याचिका फेटाळून लावली आहे. त्यांनतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाठिंबा देणारे आणि विरोधक असे दोन गट तयार झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -