Suryagrahan 2021 : यंदाच्या वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण ‘या’ ५ राशीतील व्यक्तींसाठी ठरणार शुभ

The last solar eclipse in 2021 is beneficial for five zodiac signs
Suryagrahan 2021 : यंदाच्या वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण 'या' ५ राशीतील व्यक्तींसाठी ठरणार शुभ

यंदाच्या वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण ४ डिसेंबरला होणार आहे. हे शेवटचे ग्रहण असून, ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध ठरणार नाही. सूर्यग्रहण हे अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, अटलांटिकचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया येथे असेल. पंचांगानुसार वृश्चिक आणि अनुराधा नक्षत्रात कार्तिक महिन्यातील अमावास्येला सूर्यग्रहण होणार आहे. हे सुर्यग्रहण पुढील पाच राशीतील व्यक्तींसाठी शुभ ठरणार आहे.

वृषभ : या राशीच्या व्यक्तींसाठी हे सूर्यग्रहण शुभ राहील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. बॉसशी संबंध चांगले राहतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात भाग्य तुम्हाला साथ देईल.

मकर : सूर्यग्रहणाचा तुमच्यावर शुभ प्रभाव पडेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याची प्रबळ शक्यता असेल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल.

सिंह: सूर्यग्रहण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुभ राहील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कोणताही वाद मिटवता येईल. कामामुळे तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

कन्या : या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण देखील शुभ राहील. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचे मार्ग खुले होतील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन: या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण शुभ राहील. जुने वाद मिटतील. कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळवू शकाल.

 


हे ही वाचा – कसाबचा मोबाईल परमबीर सिंहांकडे, दहशतवाद्यांना मदत केल्याचा समशेर खान पठाण यांचा आरोप