घरCORONA UPDATEमी घराबाहेर पडू शकतो का? या प्रश्नावर मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

मी घराबाहेर पडू शकतो का? या प्रश्नावर मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

Subscribe

देशात कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव अद्याप कमी झालेला नाही. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. यादरम्यान अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर देखील कारवाई केली जात आहे. तर मुंबईच्या नाक्या-नाक्यावर, गल्ली-बोळ्यांबाहेर आणि रस्त्यावर मुंबई पोलीस गस्त घातल आहेत. यात मुंबई पोलीस सोशल मीडियावरून नेहमी नागरिकांना सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देत आहेत. परंतु़ नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची मुंबई पोलिसांची ट्रिक काही औरचं असते. दरम्यान अशाच एका मुंबईकर तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देणारे मुंबई पोलिसांचे मजेशीर ट्वीट व्हायरल होत आहे.

मी घराबाहेर पडू शकतो का?

एका मुंबईकर तरुणाने एकदम साधा प्रश्न मुंबई पोलिसांना विचारला मात्र या प्रश्नावरील मुंबई पोलिसांचे उत्तर ऐकून तरुणाला ग्रह तारे आठवल्या शिवाय राहणार नाही. या तरुणाने ‘माझे नाव सनी आहे, मी घराबाहेर पडू शकतो का?’ असा प्रश्न ट्विटरवर मुंबई पोलिसांना विचारला. सनी पांडे असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या प्रश्नार्थी ट्विटला मुंबई पोलिसांनीही भन्नाट उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर या ट्विटवरुन युजर्सनेही जबरदस्त कमेंट्स व्हायरल केल्या आहेत.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

या तरुणाच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी असे उत्तर दिले की, सर, जर आपण सौर मंडळाच्या मध्यभागी असलेला खरोखरचा तारा असाल, ज्याभोवती पृथ्वी आणि सौर यंत्रणेचे इतर घटक फिरत असतात. आम्ही आशा करतो की आपण जी जबाबदारीची स्वीकारली आहे त्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव असेल. कृपया स्वत: कोरोना विषाणूच्या संपर्कात न येता स्वत:चा जीव धोक्यात घालू नका.#सनशाईनऑफसेफ्टी व्हा असे आवाहन केले आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू असताना लॉकडाऊनच्या काळातही मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून असे अनेक ट्वीट केले होते. या ट्विटच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्यासाठी कित्येक अनोख्या शक्कलही लढविल्या. इतकंच नाही तर सोशल मीडियावर ट्रेंड आणि मिम्स ट्रेंडिंगच्या माध्यमातूनही मुंबई पोलीसांनी सामान्य लोकांना जागरूकही केलं. कोरोना दरम्यान मुंबई पोलिसांचे ट्वीटही जोरदार व्हायरल झाल्याचे दिसले.

- Advertisement -

लसींचा पुरवठा सध्या मर्यादित,असला तरी सर्वांचे लसीकरण योग्य प्रकारे होईल-आर एस शर्मा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -