घरमुंबईजास्तीत जास्त आमदार निवडून आणा - उद्धव ठाकरे

जास्तीत जास्त आमदार निवडून आणा – उद्धव ठाकरे

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' ही संकल्पना

१९ जूनला शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. ‘बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद, उद्धव ठाकरे या माझ्या मोठ्या भावाचे प्रेम आणि शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी मी या कार्यक्रमाला हजर’, असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले. या सोहळ्यात भाजप आणि शिवसेना पक्षाचे प्रेम दिसून आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्षाचे संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख यांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. शिवसेना प्रमुखांनी, ‘जास्तीत जास्त आमदार निवडून आणा, तसेच १ लाख शाखाप्रमुखांची नेमणूक करणार’, असे सांगितले आहे.

बैठकीत काय काय झाले?

या बैठकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख यांना कानमंत्र दिला. आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षबांधणी मजबूत करणे आणि १ लाख शाखाप्रमुखांची नेमणूक करण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ ही संकल्पना शिवसेना पक्षाने केली आहे. या संकल्पनेअंतर्गत शाखाप्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. ही नेमणूक करताना ‘विभाग प्रमुखांनी आपल्या नातेवाईंकांना संधी देऊ नये. अनेक वर्ष कार्यरत असलेल्या शिवसैनिकांना प्राधान्य द्यावे’, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी सांगितलं. तसेच पक्षबांधणी, पक्ष विस्तार आणि सदस्य नोंदणीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी पदधिकाऱ्यांना सूचना दिल्या. स्थानिक स्तरावर पक्षाने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीची फेरतपासणी करण्याच्या सूचना देखील दिल्या. उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची तयारी दिसली पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांना सांगितलं. १४ जुलै ते २७ जुलैला ‘भगवा पंधरवडा’ शिवसेना पक्ष साजरा करणार आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बैठका होत आहेत. उद्धव ठाकरे ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत आहेत. तर आठवड्याभरापासून आदित्य ठाकरे हे मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -