घरCORONA UPDATECoronaVirus : कोरोनामुळे नगरसेवक मुलाच्या मृत्यूनंतर आईचाही मृत्यू

CoronaVirus : कोरोनामुळे नगरसेवक मुलाच्या मृत्यूनंतर आईचाही मृत्यू

Subscribe

कोरोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेते यांचे काल कोरोनामुळे निधन झाले. दुर्देवी बाब म्हणजे त्या पाठोपाठ आज त्यांच्या आईचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरसेवकांसह पत्नी, आई आणि भाऊ यांना कोरोनाची लागण

नगरसेवकासह त्यांची पत्नी, आई आणि भावाला कोरोनाची लागण झाली होती. यातून त्यांची पत्नी कोरोनामुक्त होऊन घरी परतली होती. काल (मंगळवार) उपचारादरम्यान नगरसेवकाचा मृत्यू झाला. कुटुंबावर एवढा मोठा आघात झालेला असतानाच दुसऱ्याच दिवशी नगरसेवकाच्या आईचाही मृत्यू झाल्याने नगरसेवक कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. शिवाय, एकाच कुटुंबातील दोघांचा लागोपाठ मृत्यू झाल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल

५५ वर्षीय नगरसेवकावर दोन आठवड्यांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -