Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत ५ नवीन अग्निशमन केंद्र उभारणार; जाणून घ्या कोणत्या ठिकाणी असणार केंद्र

मुंबईत ५ नवीन अग्निशमन केंद्र उभारणार; जाणून घ्या कोणत्या ठिकाणी असणार केंद्र

Subscribe

सध्या मुंबईत ३५ मोठी अग्निशमन केंद्र आणि या व्यतिरिक्त १९ लहान केंद्र आहे.

मुंबई | गेल्या काही वर्षात मुंबई शहर आणि उपनगरात टोलेजंग इमारती मोठ्या प्रमाणात उभे राहिल्या आहेत. या इमारती आणि झोपड्यामध्ये आग लागण्याच्या घटनाचे प्रमाणही तेवढेच वाढले आहे. या तुलनेत अग्निशमन (Fire Brigade) केंद्रांची संख्या कमी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नवीन पाच मोठी अग्निशम केंद्रांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने (Mumbai Fire Brigade)  दिली आहे. सध्या मुंबईत (Mumbai) ३५ मोठी अग्निशमन केंद्र आणि या व्यतिरिक्त १९ लहान केंद्र आहे. पण, आता नव्या अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णयानंतर मुंबई अग्निशमन दलाच्या संख्ये वाढ होऊन केंद्रांची एकूण संख्या ५९ पर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.

या पाच नव्या अग्निशमन केंद्रापैकी कांदिवलीत ठाकूर व्हिलेजमधील केंद्राची पायाभरणी झाली असून याच वर्षीखेरपर्यंत अग्निशमन केंद्र सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहेत. सांताक्रुझ पश्चिमेकडील जुहू तारा रोड, चेंबूरमधील माहुल रोड, अंधेरी पश्चिममधील आंबोली आणि कांजुरमार्ग पश्चिमेकडील एल. बी. एस मार्गात नवीन अग्निशमन केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. तसेच पालिकेच्या २०२२-२३ आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातही अग्निशमन केंद्राच्या तरदूत करण्यात आल्या  होत्या. अग्निशमन केंद्र बांधण्याचे काम नगर अभियंता विभागाकडून होणार आहे. येत्या दोन वर्षात अग्निशमन केंद्र पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहेत.

- Advertisement -

यंदाच्या वर्षात आगीच्या घटनांमध्ये वाढ

मुंबई नवीन उंच इमारती, जुन्या इमारती, गॅस गळती यासारख्या कारणांमुळे झोपडपट्ट्या आणि इमारतींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांच्या वेळी जवळाच्या अग्निशमन केंद्राकडून मदत मिळते. परंतु, आग मोठी असल्यास अन्य अग्निशमन केंद्राकडून मदत मिळवली जाते. यंदाच्या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ७५० हून अधिक अगीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन पाच अग्निशन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

अशी आहेत अग्निशमन केंद्राची परिस्थिती

अंधेरी आंबोली – मुंबई पालिकेच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाकडे येत आहे. काही कागदोपत्री प्रक्रिया सुरू आहेत. येत्या दोन वर्षांत अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहेत.

चेंबूर माहुल रोड – अग्निशमन केंद्रासाठी १२८ झाडे तोडावी लागणार आहेत. या ठिकाणची झाडे न तोडण्यासाठी अग्निशमन केंद्र काही अंतरावर बाजूला बांधण्याचा निर्णय झाला आहे. यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

सांताक्रुझ जुहू तारा रोड – या केंद्राच्या कामात नाल्याचाही भाग येत आहे. सध्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाकडे परवानगीसाठी पोहोचले असून येत्या दोन ते अडीच वर्षात हे अग्निशमन केंद्र सेवत येणार आहे.

 

 

- Advertisment -