घरमुंबईवापरात नसलेल्या दादर हॉकर्स प्लाझासाठी महापालिका करणार आठ कोटींचा खर्च!

वापरात नसलेल्या दादर हॉकर्स प्लाझासाठी महापालिका करणार आठ कोटींचा खर्च!

Subscribe

दादरमध्ये फेरीवाल्यांचा सुळसुळाट थांबविण्यासाठी व नागरिकांना मोकळे रस्ते, पदपथ चालायला उपलब्ध व्हावेत आणि फेरीवाल्यांना नीटपणे एकाच ठिकाणी आपला व्यवसाय करता यावा या बहुउद्देशाने मुंबई महापालिकेने दादर (प.), रेल्वे स्थानकानजिक, प्लाझा सिनेमागृहाच्या मागील बाजूच्या जागेत सन २००० मध्ये ३० कोटी रुपये खर्चून तळमजला अधिक पाच मजली 'हॉकर्स प्लाझा' इमारत उभारली होती.

मुंबई – मुंबई महापालिकेने सन २००० मध्ये दादरमधील फेरीवाल्यांसाठी रेल्वे स्थानकानजिक ३० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘हॉकर्स प्लाझा’ ची आज दूरवस्था झाली आहे. फेरीवाले या प्लाझामध्ये जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे ज्या उद्देशाने फेरीवाल्यांसाठी हे हॉकर्स प्लाझा बांधले तो उद्देशच साध्य झालेला नाही. आता या हॉकर्स प्लाझाच्या अंतर्गत दुरुस्ती व इतर कामांसाठी आणखीन ८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा राहणार, शिवसेनेच्या ठाकरे गटाला विश्वास

- Advertisement -

त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चाचा व उद्देश साध्य न होणाऱ्या या ‘पांढऱ्या हत्ती’वर पालिका उगाचच खर्च का व कशासाठी करीत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. एकूणच काय तर दादरमध्ये २२ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ‘हॉकर्स प्लाझा’ आता चर्चेचा विषय बनत मुंबईकरांच्या रडारवर आला आहे.

दादरमध्ये फेरीवाल्यांचा सुळसुळाट थांबविण्यासाठी व नागरिकांना मोकळे रस्ते, पदपथ चालायला उपलब्ध व्हावेत आणि फेरीवाल्यांना नीटपणे एकाच ठिकाणी आपला व्यवसाय करता यावा या बहुउद्देशाने मुंबई महापालिकेने दादर (प.), रेल्वे स्थानकानजिक, प्लाझा सिनेमागृहाच्या मागील बाजूच्या जागेत सन २००० मध्ये ३० कोटी रुपये खर्चून तळमजला अधिक पाच मजली ‘हॉकर्स प्लाझा’ इमारत उभारली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील सर जे जे रुग्णायालात सापडले ब्रिटिशकालीन भुयार

८६५ गाळे रिकामी

मात्र ही इमारत खूपच आतील बाजूस असून तेथे ग्राहक जास्त फिरकत नाहीत. या हॉकर्स प्लाझामध्ये एक ते तीन मजल्यावरील जागेत पालिकेने फेरीवाल्यांसाठी तब्बल ८६५ गाळे बांधले. तर इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर पालिकेची काही कार्यालये आहेत. मात्र फेरीवाले या हॉकर्स प्लाझाकडे फिरकत नव्हते. ते आपल्या पूर्वीच्या जागेतच आपला व्यवसाय करीत होते. तर फार कमी फेरीवाले या हॉकर्स प्लाझातील जागेचा वापर माल ठेवणे, जेवण करणे, आराम करणे इतडी कामांसाठी करीत होते. मात्र फेरीवाले या प्लाझामध्ये जाण्यास तयार होत नव्हते.

हॉकर्स प्लाझाला लागली गळती

त्यातच पालिकेचे या हॉकर्स प्लाझाच्या देखरेखीबाबत दुर्लक्ष झाले होते. परिणामी या हॉकर्स प्लाझा इमारतीमध्ये पावसाळ्यात गळती लागली. इमारतीच्या भिंतीला काही ठिकाणी तडे गेले. ड्रेनेज सिस्टिम जुनी झाली असून प्लाझामध्ये काही प्रमाणात अस्वच्छता आहे. इमारतीला लावलेल्या काचा पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्लाझामध्ये मोठ्या प्रमाणात देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने करणे गरजेचे झाले. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या मार्केट विभागाचे प्रमुख प्रकाश रसाळ यांनी दिली.

त्यामुळे या ‘हॉकर्स प्लाझा’ची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात येणार आहे. पालिकेच्या इमारत व देखभाल विभागाच्या माध्यमातून ही दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका तब्बल ७ कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये खर्च करमणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -