घरCORONA UPDATEकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ‘रोजा’बाबत विचार करावा - महापौर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ‘रोजा’बाबत विचार करावा – महापौर

Subscribe

जरी धर्माचा मुद्दा असला, तरी रोजाबाबत या समाजातील बांधवांनी विचार करावा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुस्लिम समाजातील बंधू भगिनींना केला आहे.

मुस्लिम बांधवांचा रमझान महिना सुरू होत आहे. त्यामुळे त्यांचे रोजा सुरू होणार आहेत. पण कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हे आवश्यक आहे. त्यामुळे या वेळेला समाजाने सतर्क राहण्याची गरज आहे. जरी धर्माचा मुद्दा असला, तरी रोजाबाबत या समाजातील बांधवांनी विचार करावा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुस्लिम समाजातील बंधू भगिनींना केला आहे.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनाबाबत चाचणी झाली असून त्यांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्यापैकी काही पत्रकारांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या, माझी ‘कोविड – १९’ची पहिली आणि दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता तिसरी चाचणी सात दिवसांनी करणार आहे. ती सुद्धा निगेटिव्ह येईल असे मला वाटते. त्यानंतर मी माझ्या महापालिका कार्यक्षेत्रात जोमाने काम करणार आहे. लोकांमध्ये जाऊन समस्या समजून घेणे, हे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईत रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय, आणि काही ठिकाणी नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ३०० रेड झोन आपण कायम ठेवले आहेत. मुंबईकरांनी केलेले सहकार्य खूप चांगले आहेत. रुग्णालयात वॉर्ड बॉय लेव्हलच्या तक्रारी येत आहेत. त्याकडे आम्ही लक्षही देत आहोत. कोविड-१९ रुग्णाबरोबर वेगळी वागणूक करू नका. काही सोसायटीमध्ये रुग्णांना मिळणारी वागणूक क्लेशदायक आहे. ३०० रेड झोनमध्ये अधिक कडक धोरण करणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. आपण धारावीसाठी बाहेर पण कोरेन्टीन झोन करीत आहोत. कोरोनाग्रस्त नाहीत त्यांना सुरक्षित ठेवणं महत्वाचे आहे. वरळीचा पॅटर्न धारावीत राबवणार आहोत. दोन्ही पालकमंत्री धारावीवर लक्ष ठेऊन आहेत.

कुणीही आजार लपवू नका

आजार लपवू नका, असे आवाहन करत महापौरांनी लपून राहून आपण सगळ्यांना धोक्यात घालू नका, असेही म्हटले आहे. वरळीत घरोघरी जाऊन टेस्ट केल्या. लवकर या म्हणजे सर्वांवर उपचार चांगले होतील. लोकांनी चांगली साथ दिली तर लॉकडाऊन लवकर उठेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -