घरक्राइमकुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडलेल्या 'त्या' महिलेच्या हत्येचे गूढ उलगडले

कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडलेल्या ‘त्या’ महिलेच्या हत्येचे गूढ उलगडले

Subscribe

मुंबई : कुर्ला परिसरात रविवारी एक सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गूढ उलगडण्यात अखरे पोलिसांना यश आले आहे. या मृत महिला धारवीतील रहिवासी असून तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी प्रियकराला अटक केली आहे. मृत महिला आणि प्रियकर हे दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे पोलिसांच्या तपासून उघड झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा लिव्ह-इन रिलेशनशिपमधील खुनांच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे अधोरेकीत झाले आहे.

पोलिसांनी सुटकेसमध्ये सापडेल्या मृत महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात यश आले आहे. यानंतर पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटली असून या महिलेच्या प्रियकर तिच्या चारित्र्याच्या संशयावरून तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी आहे. आरोप आणि मृत महिला दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांनी आरोपीला हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; मुंबई महिलांसाठी सुरक्षित की असुरक्षित?

नेमके काय झाले?

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (19 नोव्हेंबर) कुर्ला पोलीस ठाण्यात एक संशयीत सुटकेस आढळून आल्याचा फोन आला. ही सुटकेस सी. एस. टी. रोड शांतीनगर समोरील मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरेकेटच्या आतील बाजूला होती. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी सुटकेसची तपासणी केल्यानंतर त्यात एका महिलेचा मृतदेह मिळाला होता.
यानंतर पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला होता. आरोपी आणि मृत महिला किती वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि महिलेची हत्या करण्यामागचे नेमके कारण काय?या सर्वांचा तपास पोलीस करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार; रुपाली चाकणकर आणि सुषमा अंधारेची तीव्र प्रतिक्रिया

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील गुन्ह्यात वाढ

काही महिन्यांपूर्वी मुंबईसह देशभरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये हत्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यात श्रद्धा वालकर हिच्या हत्या आणि मिरा भाईंदरमध्ये सरस्वती वैद्य हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिपवर अनेक ऊहापोह झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -