Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई गोदीत काम करणाऱ्या बापाचं नाव काढलं...; झोपडपट्टीत राहाणाऱ्या तरुणाचं युपीएससीत घवघवीत यश

गोदीत काम करणाऱ्या बापाचं नाव काढलं…; झोपडपट्टीत राहाणाऱ्या तरुणाचं युपीएससीत घवघवीत यश

Subscribe

मुंबई : मुंबईतील सोलापूर स्ट्रीट हा वाडीबंदर परिसरात राहणाऱ्या गोदी कामगार राहतात. यापैकी एका गोदी कामगाराच्या घरी मंगळवारी (23 मे) आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कारण होते देशातील अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या युपीससी परीक्षेत गोदीतील सुपरवायझर रमजान सय्यद यांच्या कुटुंबातील सर्वात लहान असलेल्लया मोहम्मद हुसेन याने उज्जव यश मिळवले आहे. (Mohammed Husain living in a slum has a quick success in UPSC)

वडील गोदीत सुपरवायझर असल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची सुद्धा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोहम्मद हुसैन याने पाचव्या प्रयत्नात 27 व्या वर्षी युपीएससी परीक्षेत 570 वी रँक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. देशाच्या सर्वोच्च नोकरशाहीसाठी आयोगाने शिफारस केलेल्या 933 उमेदवारांना परीक्षेच्या निकालांनी आनंद आणि दिलासा दिला  आहे. परंतु मोहम्मद हुसेनने खडतर प्रवास करत सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांचा सामना करताना साधलेले यश विशेष उल्लेखनीय आहे.

- Advertisement -

मोहम्मद हुसेन वाडीबंदर झोपडपट्टीत आई-वडील, आजी, मोठे भाऊ आणि त्यांच्या बायका आणि त्यांच्या मुलांसोबत विस्तारित कुटुंबात राहतो. या कुटुंबाची मुळे हैदराबाद, तेलंगणा येथे आहेत, तर गेल्या तीन पिढ्यांपासून ते मुंबईत आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या नागरी सेवांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी प्रतिनिधित्व असलेल्या मुस्लिम समुदायाशी संबंधित असल्यामुळे युपीएससी सीएसई परीक्षा पास होणे आणखी कठीण काम होते. परंतु मोहम्मदच्या वडिलांना मुलांना शिकविण्याची मोठी जिद्द होती. त्यामुळेच त्यांनी मोहम्महला नेहमी शिक्षणासाठी पाठबळ दिले. मोहम्मदचे आजोबा सरकारी नोकरीत होते, मात्र शिक्षण नसल्यामुळे मोहम्मदच्या वडिलांना सरकारी नोकरी करता आली नाही, त्यांनी गोदी कामगार म्हणून कामाला सुरुवात केली, सध्या ते गोदीत सुपरवायझर म्हणून काम करत आहेत.

मोहम्मदच्या वडिलांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी डोंगरीतील सेंट जोसेफ शाळेत घातले. त्यानंतर मोहम्मदने पदवीचे शिक्षण एलफिन्सटन काँलेजमधून पूर्ण केले. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युपीएससीची तयारी सुरु केली. त्यानंतर हज हाऊस येथे युपीएससीसाठी चालवल्या जाणाऱ्या कोचिंगमध्ये मोहम्मदने युपीएससीचा अभ्यास केला. तसेच पुण्यातील युनिक ऍकेडमी, दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामिया येथे देखील त्याने युपीएससीचा अभ्यास केला आणि घवघवीत यश मिळवले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -