Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उत्तर भारतीय संघाने कर्करोग रुग्णांच्या सुविधेसाठी उभारले निवास केंद्र

उत्तर भारतीय संघाने कर्करोग रुग्णांच्या सुविधेसाठी उभारले निवास केंद्र

उत्तर भारतीय संघाकडून कर्करोग रुग्णांच्या सुविधेसाठी वांद्रे येथे उभारले निवास केंद्र.

Related Story

- Advertisement -

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालय व अन्य रुग्णालयात कॅन्सर आजारावर उपचारासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आदी भागातून येणाऱ्या रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या निवासासाठी, विश्रांतीसाठी उत्तर भारतीय संघाकडून वांद्रे (पूर्व), टीचर्स कॉलनी या ठिकाणी उत्तर भारतीय भवनातील इमारतीमध्ये ३ कोटी ७० लाख रुपये खर्चून ६ हजार ८०० चौरस फूट जागेत ५० बेडचे डोरमेंटरी आणि पाच एसी रूम तयार करण्यात आलेले आहे. येत्या २० मे रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या निवास केंद्राचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही सुविधा सुरू होणार आहे. ही सुविधा सुरू होताच उत्तर भारतातून येणारा कर्करोग रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, यानिमित्ताने हे तीन दिग्गज नेते एकत्रितपणे एकाच व्यासपीठावर महाराष्ट्राच्या जनतेला आणि उत्तर भारतीयांना पाहायला मिळणार आहेत. यासंदर्भातील माहिती उत्तर भारतीय संघाचे विशेष ट्रस्टी संतोष सिंह यांनी दिली आहे.

माफक दरात सुविधा मिळणार

मुंबईत केईएम, सायन, नायर, टाटा कॅन्सर, ब्रीच कॅण्डी, जेजे, बॉम्बे रुग्णालय, जसलोक आदी रुग्णालयात उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमधून कॅन्सर,टीबी किडनी व अन्य मोठ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. मात्र रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीही मुंबईत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना भर रस्त्यावर राहावे लागते. अथवा भाड्याने हॉटेल, लॉज आदी ठिकाणी राहणे खर्चिक असते. त्यामुळे ते पुलाखाली रस्त्यावर कुठेही राहतात. जर रुग्णाला रुग्णालयात उपचरासाठी दाखल केल्यास नातेवाईकांवर रस्त्यावर राहण्याची वेळ येते. ही गंभीर व हृद्यद्रावक स्थिती पाहता आमचे वडील, उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे आमदार आर.एन. सिंह यांनी कर्करोग पीडितांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत निवास केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांची संकल्पना अंमलात येण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला, अशी माहिती संतोष सिंह यांनी दिली आहे.

- Advertisement -

हे निवास केंद्र ‘नो प्रॉफिट , नो लॉस’ या तत्वावर चालविण्यात येणार आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना हे निवास केंद्र मुबलक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त चार धामच्या यात्रेवर आलेल्या श्रद्धाळूंसाठी निवास केंद्राची सुविधा देण्यात येणार आहे.

निवास केंद्र उभारल्याचे समाधान

कॅन्सर ग्रस्त, इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी माझ्या माध्यमातून आणि सर्वांच्या सहकार्यामधून मुंबईसारख्या ठिकाणी ‘निवास केंद्र’ उभारल्याचे समाधान वाटते आहे, असे प्रतिपादन उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष व भाजपा आमदार आर. एन. सिंह यांनी केले आहे. तसेच, निवास केंद्र निर्माण करण्याचे माझे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. त्याचा मला विलक्षण आनंद झाला आहे, असे त्यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus in Maharashtra: २४ तासांत ३ हजार ६११ जण कोरोनाबाधित; ३८ जणांचा मृत्यू


 

- Advertisement -