घरCORONA UPDATECoronaVirus: केडीएमसीत कोरोनाबाधितांचा आकडा दीडशेपार

CoronaVirus: केडीएमसीत कोरोनाबाधितांचा आकडा दीडशेपार

Subscribe

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बुधवारी नवीन १३ रूग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १५६ वर पोहोचली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बुधवारी नवीन १३ रूग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १५६ वर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या रूग्णांमध्ये ४० ते ४५ टक्के रूग्ण हे मुंबई, ठाण्यात शासकीय, निमशासकीय आणि खासगी सेवेत काम करणारे कर्मचारी आहेत. डेंबिवलीत सर्वाधिक ९४ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या १०७ आहे.

हेही वाचा – किम जोंगला कोरोनाची शक्यता आणि उत्तराधिकाऱ्याचा सस्पेन्स!

- Advertisement -

गेल्या आठवडाभरापासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत खूपच वाढ झाल्याची दिसून येत आहे. मात्र कल्याण-डोंबिवलीतून दररोज मुंबई, ठाण्यात नोकरीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. १५६ पैकी ६० च्या आसपास रूग्ण हे शासकीय निमशासकीय आणि खासगी सेवेत काम करणारे कर्मचारी आहेत. बुधवारी नव्याने आढळून १३ रूग्णांपैकी आठ रूग्ण हे मुंबईत रूग्णालयात सेवा देणारे ईसीजी टेक्नीशियन, शासकीय रूग्णालयातील नर्स, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, फार्मा कंपनीतील कर्मचारी आदींचा समावेश आहे. तर उर्वरित पाच जण हे कोरोनाबाधित रूग्णांच्या सहवासात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणडोंबिवली शहरात कडक लॉकडाऊन असला तरीसुद्धा अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी कामावर जात आहेत. कल्याण-डोंबिवलीतून मुंबई, ठाणे परिसरात दररोज कामावर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी संख्या मोठी आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्येवरून हे स्पष्ट दिसून येत आहे. शहरातील रूग्णांची संख्या हे ५५ ते ६० टक्के असून ४० ते ४५ टक्के रूग्ण हे शासकीय निमशासकीय आणि खासगी सेवेत काम करणारे कर्मचारी असल्याचे रूग्ण संख्येवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.

आतापर्यंतची रूग्ण संख्या 

  • कल्याण पूर्व – ३०
  • कल्याण पश्चिम – २०
  • डोंबिवली पूर्व – ५५
  • डोंबिवली पश्चिम – ३९
  • मांडा टिटवाळा – ५
  • मोहने – ६
  • नांदिवली – १
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -