घरCORONA UPDATEधारावीतील रुग्णांची संख्या होतेय कमी; पण लेबर कॅम्पमध्ये कोरोनाचा कहरच

धारावीतील रुग्णांची संख्या होतेय कमी; पण लेबर कॅम्पमध्ये कोरोनाचा कहरच

Subscribe

सोमवारी धारावीत ४२ रुग्ण आढळून आल्यानंतर मंगळवारी या ठिकाणी ३८ रुग्ण आढळून आले आहेत.

धारावीमध्ये रुग्णांचे प्रमाण पुन्हा या आठवड्यात कमीवर आले आहे. सोमवारी धारावीत ४२ रुग्ण आढळून आल्यानंतर मंगळवारी या ठिकाणी ३८ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे धारावी लेबर कॅम्प येथील रुग्णांची संख्या मात्र कायमच आहे. लेबर कॅम्प येथे दिवसभरात आणखी ९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीत आता लेबर कॅम्पमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणात येताना दिसत नाही. आतापर्यंत लेबर कॅम्प येथे १५८ रुग्णांची एकूण संख्या झाली आहे.

धारावीमध्ये दिवसभरात आणखी ३८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १६२१ एवढी झाली आहे. दिवसभरात माटुंगा लेबर कॅम्पसह धारावी कोळीवाडा येथे ४ रुग्ण आढळून आले. याशिवाय मेघवाडी, केलावाखार, आझाद नगर, वैशाली नगर, नवकार अपार्टमेंट,  पीएमजीपी नगर,  मुकुंद नगर, गांधी नगर, महात्मा गांधी नगर, न्यू म्युनिसिपल चाळ, लक्ष्मी चाळ, सिध्दीविनायक सोसायटी, कमला नेहरु नगर, शास्त्री नगर, आकाश गंगा सेक्टर, रेवा फोर्ट कॉलनी,शास्त्री नगर,चमडाबाजार आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले.

- Advertisement -

माहिममध्ये एमरार्ड कोर्टमध्ये सहा महिला कोरोना पॉझिटिव्ह

माहिममध्ये दिवसभरात २४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एमरार्ड कोर्ट इमारतीतील सात पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. हे सहाही पॉझिटिव्ह रुग्ण महिला आहेत. यामध्ये एकमेव महिला  ८४ वर्षाच्या असून बाकीच्या सर्व महिला या २३ ते २६ या वयोगटातील आहेत. याशिवाय माहिम पोलिस कॉलनीत आणखी ५ रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय मायनाक वाडी, सुरज वेंचुरा, व्हाईट हाऊस, पितांबर लेन, सागर सानिध्य रहिवाशी संघ, कल्पतरु सोसायटी आणि कापड बाजार आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे माहिममधील एकूण रुग्णांची संख्या ३७५वर पोहोचली आहे.

- Advertisement -

दादरमध्ये दिवसभरात सहा रुग्ण

दादरमध्ये दिवसभरात आणखी सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दादरमधील रुग्णांची संख्या २४५ वर पोहोचली आहे. दिवसभरात सुखशांती इमारतीत दोन तर उत्तुंड टॉवर, वसुदेव निकेतन, कासारवाडी, जावूशिला इमारत आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -