घरमुंबई‘त्याच्या’ वस्तू तशाच ठेवल्या होत्या

‘त्याच्या’ वस्तू तशाच ठेवल्या होत्या

Subscribe

हमीद अन्सारीच्या आईचे मातृत्व

‘वाट पाहून डोळे थकले होते पण तरीही मनात तो परत येणार म्हणून आशा होती. शेवटी तो आला या गोष्टीचा विश्वास बसत नाहिये म्हणून गेल्या दोन दिवसांपासून आम्ही त्याला वारंवार स्पर्श करून तो खरोखर आला आहे याची खात्री करुन घेतो आहोत. तो येणार हा विश्वास मनात होता म्हणून तो गेल्यापासून आतापर्यंत ६ वर्षांच्या कालावधीत घरात एकही नवीन वस्तू आईने घेऊ दिली नाही आणि बदलूही दिली नाही’. हे उद्गार आहेत पाकिस्तानात ३ वर्षांचा कारावास भोगून भारतात परत आलेल्या हमीद अन्सारीचे बंधू खालिद अन्सारी यांचे.हमीदला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने अटक केली होती. २०१५ साली त्याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. १५ डिसेंबर २०१८ साली ही शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडण्याचे आदेश देण्यात आले.

पण या सहा वर्षांत तो परत येणार अशी आशा लावून त्याच्या येण्याची वाट पाहणार्‍या आईने घरातली एकही वस्तू नवीन घेतली नाही किंवा जुनी वस्तू बदलली नाही.सहा वर्षांपुर्वी घरात असणारा तोच टीव्ही,सोफासेट,खुर्च्या, डायनिंग टेबल, आणि विशेषत: हमीदचे कपडे त्याच्या आईने सांभाळून ठेवले आहेत. मुलगा परत येणार म्हणून घरात त्यांनी एकही नवीन गोष्ट घेतली नाही .तो परत आल्यावर घेता येईल असा विचार त्याची आई नेहाल अन्सारी यांनी केला होता.सगळ्या वस्तू आहेत तशा जपून ठेवल्याने घरात येताच त्या सगळ्या नजरेसमोर पडताच हमीद जुन्या आठवणींने ढसाढसा रडला.हमीदच्या परत येण्याने घरातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. २०१२ साली मुंबईतील वर्सोवा परिसरात राहणारा तरुण हमीद अन्सारी फेसबुकवरील पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमासाठी भारतातून पाकिस्तानात गेला. मात्र बेकायदेशीर प्रवेश केल्याच्या आरोपाखाली त्याला पाकिस्तानी सैन्याने तुरुंगात डांबले. पेशावर न्यायालयाने तुरुंगात ६ वर्षांची शिक्षा भोगलेल्या हमिदला भारतात परत पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी हमीद भारतात परतला आणि त्याला पाहून घरच्यांच्या आनंद ओसंडून वाहू लागला. गेली ६ वर्षे त्याच्या येण्याची वाट पाहत असलेल्या त्याच्या आईचा त्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अश्रुंचा बांध फुटला.

- Advertisement -

फेसबुकवरच्या प्रेमावर विश्वास ठेवू नका
सोशल मीडियावर कित्येक तरुण आपला बहुमुुल्य वेळ घालवत असतात. यादरम्यान एखाद्या मुलीशी आपली ओळख होते आणि आपण तिच्या प्रेमात पडतो. पण ते प्रेम किती घातक असत याचा प्रत्यय हामीद अन्सारी या तरुणाला आला. फेसबुकवर एका तरुणीवर जडलेल्या प्रेमाने त्याला नरकयातना भोगाव्या लागल्या त्यामुळे समोरच्या मुलीला आपण कधीही पाहिलेले नसते. तो मुलगा असतो की मुलगी हेही आपल्याला माहीती नसते.म्हणून फेसबुकवरच्या अशा प्रेमावर विश्वास ठेवू नका असे आवाहन हमीद अन्सारी याने केले आहे.

तो परत येणार ही आशा आम्ही सोडली होती. पण तरी ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अचानक तो येणार असल्याची खबर मिळाली आणि आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्याच्या परत येण्याने दोन्ही देशांचे आम्ही मानावे तितके आभार कमीच आहेत. माझ्या भावाप्रमाणेच पाकिस्तानात अडकलेल्या अनेकांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन आम्ही भविष्यात करणार आहोत.
-खालिद अन्सारी, हामिद अन्सारीचा भाऊ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -