घरमुंबईशहाडचा धोकादायक पूल अखेर पाडला; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

शहाडचा धोकादायक पूल अखेर पाडला; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

Subscribe

एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर शहाड रेल्वे स्थानकावरील धोकादायक पूल आज पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मेगाब्लॉक असल्याने त्यात पुलाचे काम काढल्यामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले.

एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर शहाड रेल्वे स्थानकावरील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. रविवारी रेल्वे प्रशासनाने चार तासाचा मेगाब्लॉक घेऊन कल्याण- टिटवाळा स्थानकावरील शहाड येथील धोकादायक पूल पाडला आला. यावेळी टिटवाळा स्थानकातील नव्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्यात आले आहेत. मात्र, आज रविवारच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे खूपच हाल झाले असून याचा फायदा उठवित रिक्षा चालकांनीही प्रवाशांची लूट केली आहे.

टिटवाळा स्थानकातील नव्या पादचारी पूलासाठी टाकले गर्डर

एल्फिन्स्टन दुर्लघटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील धोकादायक पूलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यामध्ये शहाड स्टेशनवरील धोकादायक पुलाची बाब समोर आली होती. यावेळी हा धोकादायक पूल पाडून नवीन पूल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रविवारी कल्याण- कसारा मार्गावर सकाळी ११ : २५ ते ३: १५ दरम्यान चार तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. शहाड स्टेशनवरील अतीधोकादायक झालेला पादचारी पूल पाडून, टिटवाळा जवळील नव्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. टिटवाळा स्थानकात नवा पादचारी पूल उभारण्यात यावा,अशी रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांची मागणी होती. मागणीनुसार टिटवाळा येथील सहा मीटर रुंद नवीन पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच कल्याण, कसारा मार्गावरील इतर कामे या विशेष मेगाब्लॉक दरम्यान करण्यात आली आहेत. या पुलाचे काम तातडीने करून प्रवाशांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे.

- Advertisement -

रिक्षाचालकांनी केली प्रवाशांची लूट

कल्याण ते टिटवाळा दरम्यान मेगाब्लॉक असल्याने केडीएमटीने प्रवाशांसाठी जादा बसेसची व्यवस्था केली होती. मात्र बसला प्रवाशांनी खूपच गर्दी केली हेाती. कल्याणहून टिटवाळा जाण्यासाठी रिक्षा चालकांनी अव्वाच्या सव्वा शंभर रूपये प्रति प्रवासी भाडे उकळले. त्यामुळे मेगाब्लॉक असल्याने रिक्षा चालकांनी प्रवाशांची चांगलीच लूट केल्याचे समोर आले आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने विवाहसोहळे आणि इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. तसेच रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक असो अथवा लोकलचे प्रॉब्लेम रिक्षा चालकांकडून प्रवाशांची नेहमीच लुटमार करीत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.


वाचा – शहाड रेल्वे स्थानकात बिनधास्त रेल्वे क्रॉसिंग…!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -