Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई निर्णयाचा अधिकार अपात्र अध्यक्षांकडे देऊ नये - अनिल परब

निर्णयाचा अधिकार अपात्र अध्यक्षांकडे देऊ नये – अनिल परब

Subscribe

मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) कोणत्याही क्षणी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले असताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 16 आमदारांनी मतदान केलेले विधानसभा अध्यक्ष अपात्र आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे निकाल पाठवू नये.

अनिल परब म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी आमची बाजू मांडली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा घटनेच्या अनुषेद 10 मध्ये कसा बसतो हे सर्वोच्च न्यायालयात त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जे विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांच्या मतावरती अध्यक्ष झालेले आहेत. परंतु 16 आमदार अपात्रतेच्या छायेत आहेत, त्यामुळे अशा आमदारांचे मत घेऊन झालेल्या अध्यक्षांकडे ही याचिका सुनावणीसाठी न पाठवता सुप्रीम कोर्टाने ते स्वत: ऐकावे, अशी मागणी त्यावेळी आम्ही केली होती. आज या सर्व मुद्दांचा सर्वोच्च न्यायलय विचार करून काय निर्णय देणार याची उत्सुकता आम्हा सर्वांना आहे.

- Advertisement -

16 आमदारांना त्यावेळचे उपाध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रत केले होते. या अपात्रतेला आव्हान दिले गेले आहे. परंतु 16 आमदार आणि 23 आमदार अशा आमच् दोन याचिका आहेत. ज्यावेळेला 16 आमदारांचा निकाल लागेल तोच निकाल 23 आमदारांच्या बाबतीतही लागू होईल.

सर्वसाधारणपणे अध्यक्षांकडे अपात्रतेचा अधिकार असतो, परंतु अध्यक्षच अपात्रतेत आहेत. अशा अपात्र अध्यक्षांनी सुनावणी घेऊ नये, असं नबाब राबिया केसमध्ये म्हटले आहे आणि हाच मुद्दा आम्ही न्यायालयासमोर मांडला आहे. हे अध्यक्ष अपात्र आहेत. ज्या 16 आमदारांनी यांना मतदान केलं, जे अपात्र केले गेले आहेत. अशा अपात्र आमदारांमुळे निवडून आलेला अध्यक्ष देखील गैर आहे, असं देखील आमचं म्हणण होतं, त्यामुळे त्याच्याकडे सुनावणी पाठवू नये अशी आमची मागणी आहे, असेही अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -