घरक्राइमधक्कादायक! बलात्कारानंतर गर्भवती झालेल्या 12 वर्षीय पीडितेचं चक्क आरोपीबरोबरच लावलं लग्न

धक्कादायक! बलात्कारानंतर गर्भवती झालेल्या 12 वर्षीय पीडितेचं चक्क आरोपीबरोबरच लावलं लग्न

Subscribe

या धक्कादायक घटनेनंतर नागपूरमध्ये खळबळ जनक वातावरण निर्माण झालं आहे.आरोपी मुलागा पिडितेपेक्षा १० वर्षांनी मोठा असून पिडत मुलगी आता ४ महिन्याची गर्भवती आहे.

नागपूरमध्ये एका १२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचारानंतर चक्क आरोपीबरोबरच लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. अत्याचारानंतर गर्भवती झालेल्या या पीडित मुलीच्या आईवडिलांनीच तिचं लग्न तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबत लावून दिलं. या धक्कादायक घटनेनंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली असून, परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. ही पीडित मुलगी १२ वर्षांची असून, तिच्यावर लैंगिक शोषण करणारा आरोपी २२ वर्षांचा आहे.

खरंतर पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांचे शेजारी असून, तिचे आई-वडील कामावर गेल्यावर आरोपीने या संधीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. परंतु पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही गोष्ट दोन्ही कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांत तक्रार न करण्याचे ठरवून पीडित मुलगी आणि आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेचे लग्न आरोपीसोबतच लावून दिले.

- Advertisement -

शेजारी राहणाऱ्या या आरोपीने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. ती गर्भवती असल्याचा संशय दोन्ही कुटुंबीयांना येताच त्यांनी या लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिसांकडे न करता परस्पर समझोता करून दोघांचे लग्न लावून दिले. आरोपी मुलगा पीडितेपेक्षा १० वर्षांनी मोठा असून, पीडित मुलगी आता ४ महिन्याची गर्भवती आहे. हे प्रकरण पोलिसांच्या लक्षात येताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात २२ वर्षीय नराधमाविरोधात लैंगिक अत्याचार आणि बलात्कार, बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलीय.

पोलिसांना यासंबंधित माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांकडून पीडित मुलीची विचारपूस करण्यात आली. तिच्यावर अत्याचार झाल्याची गोष्ट दोन्ही कुटुंबीयांनी लपविली आणि कायद्याच्या विरोधात जाऊन तिचे लग्न बाराव्या वर्षी लावून दिले. या आरोपाखाली पोलिसांनी आरोपीच्या पालकांविरोधातही बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. दरम्यान, पीडित मुलगी आता चार महिन्यांची गर्भवती असून, सध्या तिची शारीरिक अवस्था ठीक नसल्याने तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -