मुंबईतील गोवंडीमध्ये आढळला गोवरचा डी ८ व्हेरीएंट?

गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांत गोवरचा विळखा अधिक घट्ट होताना दिसतोय. विशेष म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात गोवरचे रुग्ण आढळत असल्याचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच गोवंडीत गोवरच्या रूग्णांसोबतच रूबेलाच्या रूग्णांची संख्या आढळून आल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांत गोवरचा विळखा अधिक घट्ट होताना दिसतोय. विशेष म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात गोवरचे रुग्ण आढळत असल्याचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच गोवंडीत गोवरच्या रूग्णांसोबतच रूबेलाच्या रूग्णांची संख्या आढळून आल्याचे समजते. मुंबईत गोवंडीत आढळलेला गोवरचा विषाणू हा डी ८ टाईपचा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वाढत्या गोवरच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येत्या काळाता गोवरचा उद्रेक होऊ नये यासाठी महापालिका विशेष लक्ष ठेवून आहे. (The Peak Of Measles In Mumbai D8 Type Of Measles Has Been Detected In Govandi)

गोवंडातील रूग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर मुंबईत इतर ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ मुजीब सय्यद यांनी माहिती दिली. गोवंडी एम पूर्व विभागात मौलानांना त्यांनी गोवर, रूबेलाच्या लसीकरणासाठी आवाहन करत नमाजच्या दिवशी हा संदेश पोहचण्यासाठी मदत करावी असेही सांगितले.

गोवंडी परिसरात कमी प्रमाणात झालेले लसीकरण तसेच लसीकरणाच्या बाबतीत झालेले दुर्लक्ष पाहता याठिकाणी गोवरच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मौलवींनी शुक्रवारी नमाजच्या दिवशी आवाहन करत लसीकरण तसेच गोवरच्या आजारावर उपचारासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले. दरम्यान, युपी, बिहार राज्यातील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोक गोवंडी परिसरात वास्तव्यास आहेत. अनेकदा कमी शिक्षण, लसीकरणाबाबतची माहिती नसणे, अनेक कारणामुळे लसीकरण रखडले जाणे यासारख्या अनेक कारणांमुळे गोवरचे रूग्ण आढळून आले आहेत.

वाढत्या गोवरच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. “मुंबई महानगरातील गोवरचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा आणि रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी”, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

“लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहिम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची विशेष काळजी घ्यावी”, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


हेही वाचा – मुंबईत गोवरचा विळखा घट्ट, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक