घरमुंबईमुंबईत कोरोनामुक्तीच्या गुढ्या उभारू - महापौर पेडणेकर

मुंबईत कोरोनामुक्तीच्या गुढ्या उभारू – महापौर पेडणेकर

Subscribe

मुंबईला गुढीपाडव्याच्या पुर्वी कोरोनामुक्त करु

राज्यात मागील १० महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे मागील वर्षी गुढीपाडव्याच्या दोन दिवसपूर्वी देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. परंतु आता कोरोनाचे संकट नियंत्रणात आले आहे. राज्यासह भारतात कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणाच्या बाबतीत मुंबईत अधिक कर्मचाऱ्यांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला मुंबईत कोविन अॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, या अडचणी दुर केल्यानंतर मुंबईतील लसीकरणाचा टक्का वाढला आहे. हा टक्का असाच वाढवून मुंबईला गुढीपाडव्याच्या पुर्वी कोरोनामुक्त करु असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत शुक्रवारपर्यंत ९२% टक्के लसीकरण झाले आहे. मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. येत्या काही दिवसांत अशाच प्रकारे लसीकरणाचा टक्का वाढवू आणि मुंबईला कोरोनामुक्त करु असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोनामुक्तीच्या गुढ्या उभारु – पेडणेकर

कोरोना लसीकरणाला सुरुवात केल्यावर मुंबईत शुक्रवारपर्यंत ९२ टक्के कोरोना लसीकरण झाले आहे. लस घेण्यासाठी अधिकाअधिक कर्मचाऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. मागील वर्षी २०२० मध्ये गुढीपाडव्याच्या २ दिवासांपूर्वी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. परंतु कदाचित मार्च २०२१ मध्ये गुढीपाडव्यापूर्वी किंवा त्याच्या दोन ते आठवड्याच्या मुंबई कोविडमुक्त झालेली असेल. मुंबई कोविड मुक्त झाल्यास कोरोनामुक्तीच्या गुढ्या उभारू असे महापौर किशोरी पेडणेक यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -