घरमुंबईठाणे जिल्ह्याचे राजकारणे बदलतेय...

ठाणे जिल्ह्याचे राजकारणे बदलतेय…

Subscribe

स्थानिक स्वराज्य संस्थेतून भाजप हद्दपार होण्याची शक्यता

शिवसेनेच्या डरकाळीने राज्यातील सत्तेची समिकरणे आता बदलू लागली आहेत. नव्या महाविकासआघाडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकारण बदलू लागल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत ठाण्यात मोठा भाऊ बनण्याची भाजपची रणनिती यशस्वी ठरली असली तरीसुद्धा छोटा भाऊ ठरलेल्या शिवसेनेने याचा वचपा काढीत भाजपला राज्यातीलच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेतूनही हद्दपार केले आहे.

ठाणे जिल्ह्यात ठाणे, केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा भाईंदर या सहा महापालिका आहेत. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या राजकीय समिकरणांमुळे सेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. ठाण्यात शिवसेनेचा महापौर बिनविरोध निवडून आणला तर उल्हासनगर महापालिकेतील भाजपची सत्ता शिवसेनेने उलथून लावली आहे. या दोन्ही महापालिकेवर भगवा फडकवला आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची तर भिवंडीत काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीची सत्ता होती. पण राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी 50 नगरसेवकांसह भाजपची वाट धरल्याने नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे. एप्रिल 2020 मध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. तर ऑक्टोबर 2020 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक होणार आहे. तसेच अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर या नगरपालिका तर शहापूर नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे नव्या राजकीय समिकरणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका सहन करावा लागणार असल्याचे सध्याच्या निवडणुकांवरून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात भाजपकडे आक्रमक चेहरा नसल्यामुळे भाजप नेहमीच दुय्यम स्थानी दिसून राहिला. पण 2014 च्या निवडणुकीत शिवसेना- भाजप स्वतंत्रपणे लढले. त्यावेळी भाजपने जोरदार मुसंडी मारीत भाजपचे 9 आणि शिवसेनेचे 6 आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आमदार निवडून आले होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने युती करून निवडणुका लढविल्या. यावेळी भाजपचे 8 शिवसेना 5 आमदार निवडून आले. त्यामुळे ठाण्यात मोठा भाऊ होण्याचा मान भाजपने मिळवला.पण नव्या समिकरणांमुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेतून बाद होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -