घरमुंबईदहा दिवसांच्या गणेश विसर्जनात पावसाची हजेरी

दहा दिवसांच्या गणेश विसर्जनात पावसाची हजेरी

Subscribe

मुंबई – मुंबईत आज संध्याकाळपर्यंत दहा दिवसांच्या गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले. मात्र दिवसभर उसंत घेणाऱ्या पावसाने संध्याकाळी ५.१५ नंतर ढगांचा कडकडाट व विजेच्या कडकडाटासह बरसात केली. मात्र गणेश भक्तांनी पावसाची तमा न बाळगता गणेश विसर्जन शेवटपर्यंत पार पडलेच.

वास्तविक, हवामान खात्याने अगोदरच दिलेल्या पूर्व इशाऱ्यानुसार मुंबईत शहर व उपनगरात पावसाने बरसात केली. मात्र, रात्री ८ ते ९ या कालावधीत पावसाचा जोर कमी झाला. शहर भागात कमी व उपनगरात जास्त पाऊस पडला. शहर भागात हलका पाऊस पडला. तर पूर्व उपनगरातील मुलुंड येथे ३५ मिमी, भांडुप – ३० मिमी, तर पश्चिम उपनगरातील कांदिवली भागात २४ मिमी, बोरिवली – २२ मिमी आणि दहिसर – १८ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

- Advertisement -

सुदैवाने मुंबईतील सखल भागात कुठेही पावसाचे पाणी साचल्याचे वृत्त नाही. रेल्वे व रस्ते वाहतूक पावसामुळे विस्कळीत झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -