करोना रोखण्यासाठी पंतप्रधानांनी दिला ‘नमस्ते’चा मंत्र

करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नियमितपणे हातमिळवणी (शेक हँण्ड) करण्याऐवजी ऐकमेकांना नमस्कार करण्याची सवय लावून घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले.

Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

करोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उपायांपैकी एक म्हणजे नियमितपणे हातमिळवणी (शेक हँण्ड) करण्याऐवजी ऐकमेकांना नमस्कार करण्याची सवय लावून घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पार पडलेल्या एका परिषदेमध्ये केले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्यावर दोन्ही हात जोडून नमस्कार करतात. परंतु सध्या पाश्चिमात्य संस्कृतीमुळे जुनी परंपरा संपुष्टात आली आहे. जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले असून या रोगापासून आपला बचाव करण्यासाठी हात मिळवणी (शेक हँण्ड) न करता दोन्ही हात जोडून नमस्कार करावा.

संपूर्ण जग नमस्ते करण्याची सवय लावत आहे. आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुसरण केले असेल तरी ती सवय सोडून हात जोडण्याची चांगली सवय पुन्हा नव्याने अंमलात आणण्याची ही योग्य वेळ आहे. भारतीय जनऔषधी परियोजना केंद्राच्या व्हिडिओ कॉन्फरर्नसच्या माध्यमातून पंतप्रधानांनी नागरिकांशी थेट संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. यावेळी पंतप्रधानांनी गुवाहाटी, देहरादून, कोयंम्बतूरसह देशभरातील निवडक स्टोअर मालक आणि लाभार्थींशी संवाद साधला. त्याआधी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही आपल्या देशवासियांना करोना व्हायरसपासून रोखण्यासाठी हातमिळवणीऐवजी दोन्ही हाताने जोडून नमस्ते करण्यासाठी प्रोत्साहित केले होते.

डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या…

करोना व्हायरसच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आतापर्यंत करोना व्हायरसमुळे देशातील ३१ लोकांना संसर्ग झाल्याचे निष्पण झाले आहे. अशावेळी अफवा देखील पटकन पसरतात. हे खाऊ नका आणि तसे करू नका. तसेच करोना टाळण्यासाठी विविध उपाय घेऊन येतात. परंतु तुम्ही जे काही कराल ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा, असेही पंतप्रधानांनी सांगितले आहे.

नमस्कार केल्यामुळे शुन्य बॅक्टेरिया पसरतात

हातमिळवणी (शेक हँण्ड) – १२४ दशलक्ष बॅक्टेरिया

हायफाय – ५५ दशलक्ष बॅक्टेरिया

फस्ट बम्प – ७ दशलक्ष बॅक्टेरिया

नमस्कार – ० बॅक्टेरिया