घरमुंबईआयटीआय’मध्ये गुणवंतांचा टक्का वाढला

आयटीआय’मध्ये गुणवंतांचा टक्का वाढला

Subscribe

प्रथम, विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांकडूनही प्राधान्य

प्रतिनिधी:-वाढती रोजगारी, नोकरीसाठी करावी लागणारी वणवण यामुळे आता प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढू लागला आहे. तीन वर्षांमध्ये प्रथम आणि विशेष श्रेणीमधील तब्बल 1 लाख 59 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असली तरी विशेष श्रेणीमधील विद्यार्थ्यांचा टक्काही हळूहळू वाढत आहे.

दहावीचा निकाल लागल्यानंतर 35 ते 50 टक्क्यांदरम्यान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे कल असतो. त्यामुळे आयटीआयमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या फार कमी दिसून येते. परंतु काही वर्षांपासून विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊनही नोकरी मिळण्यात निर्माण होणार्‍या अडचणी आणि आयटीआयमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनिअरींगच्या दुसर्‍या वर्षाला थेट प्रवेश मिळतो. यामुळे दहावीतील गुणवंत विद्यार्थी आता आयटीआयला प्रवेशाला प्राधान्य देऊ लागले आहेत. तीन वर्षांमध्ये आयटीआयला प्रवेश घेणार्‍यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. 2015 मध्ये 1 लाख 8 हजार 924 विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतले. त्यापैकी प्रथम श्रेणीत 39 हजार 701 तर विशेष श्रेणीमध्ये सात हजार 308 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत गेली आहे. 2016 मध्ये विशेष श्रेणीच्या सात हजार 509 तर प्रथम श्रेणीच्या 45 हजार 88 विद्यार्थ्यांनी आणि 2017 मध्ये विशेष श्रेणीतील 11 हजार 818 तर प्रथम श्रेणीतील 47 हजार 861 विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेतला. गुणवंत विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे वाढता कल पाहता आता आयटीआयमध्येही प्रवेशासाठी चढाओढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

राज्यात यावर्षी सरकारी आयटीआयमध्ये 94 हजार 405 आणि खासगी आयटीआयमध्ये 50 हजार 369 अशा 1 लाख 44 हजार 774 जागा होत्या. त्यापैकी तब्बल यंदा 1 लाख 21 हजार 487 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 90 पेक्षा अधिक गुण असलेले 265 विद्यार्थी तर, 80 ते 90 टक्के गुण मिळवलेले 7 हजार 499 आणि 70 ते 80 टक्के गुण मिळवलेल्या 26 हजार 232 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यावर्षी राज्यभरातून तब्बल 4 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 21 हजार 484 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

तीन वर्षातील विशेष श्रेणीतील गुणवंत

टक्केवारी         2017      2016          2015
95 ते 100        9            0                2
90 ते 94.99     58         10              47
85 ते 89.99    748        270            407
80 ते 84.99    3400      1792          1966
75 ते79.99     7603      5437          4886

- Advertisement -

एकूण             11818   7509         7308

तीन वर्षातील प्रथम श्रेणीतील गुणवंत

70 ते 74.99   12838    10710    9199
65 ते 69.99   16758    15814    13275
60 ते 64.99   18265    18564    17227

एकूण 47861 45088 39701

सरकारी खासगी एकूण
जागा 94405 50369 144774
घेतलेले प्रवेश 86639 34848 121487

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -