घरमुंबईकरोना: ३१ मार्चपर्यंत रेल्वे हेरिटेज म्युझियम बंद राहणार

करोना: ३१ मार्चपर्यंत रेल्वे हेरिटेज म्युझियम बंद राहणार

Subscribe

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील हेरिटेज वास्तू संग्रहालय ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

महाराष्ट्रसह मुंबईत करोना व्हायरस शिरल्याने या व्हायरसचा धसका मध्य रेल्वेने घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील हेरिटेज वस्तू संग्रहालय ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्याच बरोबर हेरिजेट ईमारतीत पर्यटकांना प्रवेश करण्यास बंदी केली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने युद्ध स्तरावर जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. खासगी जाहिरात काढून करोना व्हायरस विषयी जनजागृतीच्या जाहिराती आणि उदघोषणा होत आहेत. त्या दोन्ही निर्णयांमुळे काही कालावधीसाठी रेल्वे प्रशासनाचे दररोज लाखो रूपयांचे नूकसान होत आहे.

मोठ्या प्रमाणात जनजागृती 

युनेस्कोने जागतिक दर्जा प्रदान केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) इमारतीत हेरिटेज म्युझियम आहे. या म्युझियमला दररोज शेकडो विद्यार्थी आणि विदेशी पर्यटक भेट देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरसने राज्यात धुमाकळा घातल्याने पर्यटकांच्या आणि रेल्वे कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी ३१ मार्च २०२० पर्यंत हेरिटेज म्युझियम बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याच बरोबर हेरीटेज वॉक सुध्दा बंद करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर करोना व्हायरस पसरु नये, म्हणून रेल्वेने करोना व्हायरस बद्दल प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी रेल्वे स्थानंकावर, रेल्वे गाडयांमध्ये आणि रेल्वे परिसरात करोना व्हायरस संबंधीत जाहिराती लावल्या आहे. तसेच रेल्वे गाडयांचा उद्घोषणेत करोना व्हायरस संबंधीत जनजागृती करण्यात येत आहे.

- Advertisement -

रेल्वेच्या महसूलात मोठी घट

रेल्वेत आतापर्यंत सुरु असलेल्या खासगी जाहिराती काढल्याने रेल्वेच्या महसूलात मोठी घट झाली आहे. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम रेल्वे समोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करोना व्हायरस पासून घ्यावयाची काळजी यासंबंधीत मोठ्या व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे स्थानकात, रेल्वे परिसरात करोना व्हायरसविषयी जनजागृती करणारे सूचना फलक, स्थानिक भाषेत प्रदर्शित करण्यात येत आहे. तसेच जनजागृतीसाठी अनेक लघुपट तयार करण्यात आले आहेत. याशिवाय रेल्वेचे दवाखाने मदतीसाठी २४ तास सुरु असणार आहेत. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही सूरु केल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -