नोकरभरती! मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील अनेक कंपन्यांना नोकरभरती सुरू केली आहे. असे असतानाच आता मुंबई उच्च न्यायालयातही काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील अनेक कंपन्यांना नोकरभरती सुरू केली आहे. असे असतानाच आता मुंबई उच्च न्यायालयातही काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. (The recruitment process is being implemented to fill the vacancies of various posts in the establishment of Bombay High Court)

नोकरभतीच्या या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वकील (Advocate/Counsels) पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतील (Bombay High Court) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. अधिक माहिती https://bombayhighcourt.nic.in/index.php या अधिकृत वेबसाइट उपलब्ध करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये (Bombay High Court) इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या पदासाठी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अधिकृत लिक्विडेटर, उच्च न्यायालय, बॉम्बे 5व्या मजल्यावर, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई – 400023.


हेही वाचा – ‘या’ कंपनीमध्ये विविध पदांवर भरती, पगारही 3 लाखांपर्यंत