घरमुंबईठाण्याच्या खाडीकिनार्‍यावर इतिहासाचे अवशेष दुर्लक्षित

ठाण्याच्या खाडीकिनार्‍यावर इतिहासाचे अवशेष दुर्लक्षित

Subscribe

ठाणे पूर्व गणपती विसर्जन घाट परिसरात ऐतिहासिक तोफा सापडल्या आहेत. मागील महिन्यात खोदकाम करताना चेंदणी कोळीवाड्याच्या बंदरावर उलट्या गाडलेल्या अवस्थेत या तोफा आढळून आल्या. महाराष्ट्र शासनाच्या गड किल्ले संवर्धन समितीच्या माध्यमातून या तोफांचे संवर्धन करण्याची मागणी कोपरीकरांनी केली होती. मात्र त्याला होणार उशीर पाहता अखेर कोपरी परिसरातील चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन तोफांची पाहणी करून साफसफाई केली. तसेच विसर्जन घाट परिसरात याचे सुशोभिकरण केले जाणार असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिन जोशी यांनी दिली.

मिठ बंदरावरील या तोफा पोर्तुगिझांच्या काळातील आहेत. पोर्तुगिझांनी ठाणे किल्ला बांधल्यावर किल्ल्यावरील बुरुज आणि खाडी किनारी उभारलेल्या पाणबुरुजांवर या तोफा लावण्यात आल्या होत्या. या तोफांच्या सहाय्याने पोर्तिगिझांनी ठाणे खाडीवर आपले वर्चस्व राखले होते. पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने जेव्हा पोर्तुगिझांवर विजय मिळविला तेव्हा एकूण 79 तोफा मराठ्यांच्या हाती लागल्या. किल्ल्याचे बुरुज आणि पाणबुरुजावर असलेल्या या तोफांसह पोर्तुगिझांच्या गलबतावर चढविलेल्या 16 तोफा मराठ्यांच्या हाती लागल्या. भारताच्या इतर भागात घेऊन जाण्यासाठी गलबतावर चढलेल्या या तोफा चेंदणी बंदरावरून हस्तगत करुन बंदरावर उतरविण्यात आल्या. पेशव्यानंतर आलेल्या इंग्रज राजवटीतही त्या तोफा विनावापर पडून होत्या. साधारणत: अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चेंदणीतील कोळी लोकांनी पोर्तुगिझ सैन्यातील या तोफा नौका बांधण्यासाठी किनार्‍यावर उलट्या गाडण्याची कल्पकता आणि हिंमत दाखवली. गावठाण संवर्धन समितीने केलेल्या संशोधनातून या तोफांची अशी माहिती मिळत आहे.

- Advertisement -

चेंदणी बंदराशी निगडित असलेला दैदिप्यमान ऐतिहासिक तोफांचे संवर्धन करण्याची रीतसर परवानगी पुरातत्व विभाग तसेच मेरीटाइम बोर्ड यांनी दिली आहे. चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्टच्या माध्यमातून पुढाकार घेऊन तोफांची जपवणूक करण्यात येणार आहे.
सुबोध ठाणेकर, सदस्य, चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -