घरमुंबईदुसरा डोसला नऊ महिने झाले असतील तरच मिळेल बूस्टर डोस

दुसरा डोसला नऊ महिने झाले असतील तरच मिळेल बूस्टर डोस

Subscribe

दुसरा डोस आणि बूस्टर डोसमध्ये नऊ महिन्यांचे अंतर असणे आवश्यक आहे. नऊ महिन्यांचे अंतर असेल तरच नागरिकांना बूस्टर डोस मिळेल, अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार १० जानेवारीपासून देशातील डॉक्टर, हेल्थ वर्कर आणि ज्येष्ठ नागरिक यांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. मात्र दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर हे किमान नऊ महिने किंवा ३९ आठवडे इतके असणे आवश्यक आहे. म्हणजेच दुसरा डोस घेऊन नऊ महिने झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस मिळणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर जाण्यापूर्वी दुसर्‍या डोसची तारीख पाहण्यात यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नव्याने आलेला ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे देशातील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णालयांमध्ये सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेकजण बूस्टर डोस घेण्यासाठी धाव घेण्याची शक्यता आहे. मात्र दुसरा डोस आणि बूस्टर डोसमध्ये नऊ महिन्यांचे अंतर असणे आवश्यक आहे. नऊ महिन्यांचे अंतर असेल तरच नागरिकांना बूस्टर डोस मिळेल, अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी दिली. तसेच दुसरा डोस घेऊन तुम्हाला नऊ महिने पूर्ण झाले असतील आणि त्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल तर तुम्हाला बूस्टर डोससाठी आणखीन किमान तीन महिने वाट पाहावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्ही दुसरा डोस कधी घेतला याची तारीख पाहुनच लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस घेण्यासाठी जा, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -