घरमुंबईडोंबिवलीत इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला

डोंबिवलीत इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला

Subscribe

डोंबिवली स्टेशन परिसरातील म्हात्रे इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळ्याची घटना घडली आहे.

डोंबिवली रेल्वे स्टेशन समेारील म्हात्रे नावाच्या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर व्यावसायिक दुकाने आहेत. तर तिसरा आणि चौथा मजला वापराविना पडून होता. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. मात्र स्लॅब कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरात दुकानदार व ग्राहकांची धावपळ उडाली हेाती. ही इमारत त्वरीत खाली करण्यात आली.

दरम्यान महापालिकेकडून वरील दोन मजल्यावरील बांधकाम दुपारी तोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र बिल्डिंग मालक यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांना विनंती करून सदर बांधकाम ते स्वतः लवकरच तोडणार असल्याचे सांगितल्याने ही कारवाई मागे घेण्यात आली.

- Advertisement -

इमारतीची देखभाल दुरुस्ती होत नव्हती

रेल्वे स्थानकाशेजारीच वर्दळीच्या रस्त्यावर ही तळ अधिक चार मजल्याची ही इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर १० दुकाने आहेत. पहिल्या मजल्यावर साई पूजा बार आणि दुसऱ्या मजल्यावर बाळकृष्ण मंगल कार्यालय आहे. तिसरा आणि चौथा मजला हा वापराविना पडून होता. दोन्ही मजले रिकामे असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती देखील केली जात नव्हती. त्यामुळे या दोन्ही मजल्यावर स्लॅबचा भाग हा कमकुवत झाला हेाता.

इमारतीचा स्लॅब तातडीने पाडण्याची मागणी

गुरुवारी दुपारी स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. यावेळी मोठा आवाज झाल्याने बारमधील कर्मचारी व ग्राहक तसेच तळ मजल्यावरील दुकानदार व ग्राहकांनी बाहेर धाव घेतली. नगरसेवक मंदार हळबे, महापालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीचा चालू असलेला वापर थांबविण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे तसेच धोकादायक झालेला इमारतीचा स्लॅब तातडीने पाडून टाकण्याची मागणी नगरसेवक हळबे यांनी केली.

- Advertisement -

रविंद्र चव्हाणांची घटनास्थळी धाव

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समजाताच मुंबई येथे पक्षाच्या बैठकीस लोकलने जात असतानाच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मुख्य बाजारपेठेतील हा रस्ता असून वर्दळीचा असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेत, त्या इमारतीच्या समोरच रेल्वेच्या मध्यभागी असणारा पादचारी पूल हा एका दिशेने ताबडतोब बंद करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. तसेच पालिका अधिकाऱ्यांना योग्य त्या कारवाईचे आदेश रविंद्र वायकर यांनी दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -