घरताज्या घडामोडीजोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मेट्रोसाठी १ हजार ७०० झाडांवर कुऱ्हाड

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मेट्रोसाठी १ हजार ७०० झाडांवर कुऱ्हाड

Subscribe

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणाच्या कमासाठी १ हजार ७०० झाडे बाधा आणत अससल्याने ती झाडे आता हटविण्यात येणार आहेत.

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी शेकडो झाडांची यापूर्वीच्या सरकारने एका रात्रीत कत्तल केल्याने मोठा हलकल्लोळ झाला होता. विशेषतः शिवसेना आणि पर्यावरण प्रेमींनी रान उठवले होते. मात्र, आता राज्यात ठाकरे सरकार आले असून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणाच्या कमासाठी आणि मेट्रो रेल्वे -२ बी आणि मेट्रो -४ च्या कामात बाधक ठरणार असल्याने एकूण १ हजार ७०० झाडे हटविण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी पालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने सत्तेचा घास तोंडामधून काढून घेत आरेमधील कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतल्याने दुखावलेल्या भाजपकडून यानिमित्ताने भांडवल केले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

भाजपकडून विरोध होण्याची शक्यता

भाजपलाही काहीतरी निमीत्त हवेच असल्याने आता १ हजार ७०० झाडे हटविण्यास भाजपकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अथवा शिवसेनेला याबाबत चांगलाच जाब विचारून फैलावर घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यावरण प्रेमी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणासह मेट्रो २ बी व मेट्रो ४ च्या कामात अडथळा ठरणाऱ्या १ हजार ७०० झाडे हटविण्यात येणार आहेत. परंतु, झाडांची कत्तल करण्याआधी स्थानिक लोकांकडून हरकती आणि सूचना पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मागवल्या आहेत.

स्थानिक नागरिकांकडून मागविल्या सूचना

जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ६०० झाडांना अन्य ठिकाणी पुनरोपित करणे आणि १२० झाडे कापणे यासाठी स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत.
तसेच, मेट्रो २ बी च्या कामात अडथळा ठरणारी ८०० झाडे कापण्यासाठी अथवा अन्य ठिकाणी पुनरोपित करण्यासाठी स्थानिक लोकांना हरकती आणि सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरणप्रेमींकडूनही हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. लोकांच्या हरकती सूचना लक्षात येत्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड़ला अंधेरी पश्चिम लोखंडवाला संकुलापर्यंत जोडण्याचा निर्णय रस्ते विभागाने घेतला आहे. जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड रुंदीकरणा दरम्यान, एस.व्ही. रोड अंधेरी येथून एक किलोमीटर लांब आणि १२० फुट रुंद करण्यात येणार आहे. हा रस्ता दोन लेनमध्ये होणार असून यामुळे लोखंडवाला ते पूर्व एक्सप्रेस हाइवेवर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार असल्याचे रस्ते विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मात्र, त्यासाठी काही झाडांचे बळी जाणार आहेत. आता यासंदर्भातील प्रस्तावावर आगामी वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत काय निर्णय होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


हेही वाचा – टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक TV च्या सीईओना अटक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -