घरक्राइमघरगुती भांडणातून मुलाने केली वयोवृध्द पित्याची हत्या

घरगुती भांडणातून मुलाने केली वयोवृध्द पित्याची हत्या

Subscribe

घरगुती भांडणातून ६५ वर्षीय पित्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी मुलाला अटक करून त्याच्या विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिजेश पाटील असे आरोपीचे नाव आहे.

गुरुनाथ पाटील (६५) असे हत्या करण्यात आलेल्या वयोवृद्ध पित्याचे नाव आहे. गुरुनाथ हे मुलगा ब्रिजेशसह भिवंडीतील कामतघर येथे राहण्यास होते. गुरुनाथ आणि ब्रिजेश यांच्यात मागील काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. रविवारी दुपारी हा वाद विकोपाला गेला आणि ब्रिजेशने मटण कापण्याच्या चाकूने पिता गुरुनाथ यांच्या गळ्यावर आणि पोटावर वार करून जखमी केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुरुनाथ यांना नातेवाईकांनी उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी मुलगा ब्रिजेशला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -