घरमुंबईपोहरादेवी गर्दीप्रकरणी आपला माणूस असेल तरी कारवाई होणार - संजय राऊत

पोहरादेवी गर्दीप्रकरणी आपला माणूस असेल तरी कारवाई होणार – संजय राऊत

Subscribe

पुद्दुचेरी आणि महाराष्ट्रात फरक - राऊत

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी काल तब्बल १५ दिवसानंतर पोहरादेवी मंदिरात हजेरी लावली होती. यावेळी बंजारा समाजाच्या समर्थकांनी तोबा गर्दी केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनामध्ये अलोट गर्दी समर्थकांनी केली यावर नक्कीच कठोर कारवाई होणार आहे. आपला माणूस असला तरी कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पोहरादेवी परिसरात संजय राठोड यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी झाली होती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवण्यात आली. गर्दी न करण्याचे आदेश असतानाही गर्दी करण्यात आली याविरोधात मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत कठोर आहेत. त्यामुळे कोणी आपले असले तरी कारवाई होणारच असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पुद्दुचेरी आणि महाराष्ट्रात फरक – राऊत

पुद्दुचेरीमध्ये भाजपाने काँग्रेस सरकारची सत्ता उलथवली आहे. यानंतर आता महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसला सुरु करुन महाविकास आघाडीची सरकार उलथवू असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून केले जात आहे. यावरही संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. पुद्दुचेरी आणि महाराष्ट्रात फरक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे, आणि ती पुढे जाईलच, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्रात सत्ता उलथवण्याची वटवट करु नका असा इशाराही शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -