आरे वृक्षतोडीविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता

पर्यावरण प्रेमींनी आरेतील कारशेडच्या कामावर स्थगिती आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हे काम थांबविण्याची मागणी केली. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील आरे(mumbai aarey) मधील वृक्षतोडीवरून मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला होता. त्याच प्रमाणे हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. आरेतील वृक्षतोडीविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला आरेतील कारशेडच्या कमला सुरुवात झाली अजून दुसरीकडे मात्र पर्यावरण प्रेमींनी मात्र या कमला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमींनी आरेतील कारशेडच्या कामावर स्थगिती आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हे काम थांबविण्याची मागणी केली. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा – Save Aarey: आरेचे जंगल अबाधित राहणार; मुख्यमंत्र्यांनी शब्द राखला

मुंबईतील गोरेगाव(mumbai goregaon) येथे असलेल्या अरे मध्ये ‘मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन’ कडून वृक्षतोड करण्यात आली आणि आता अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले आहे. पर्यावरण प्रेमींकडून या कामाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.  एकूणच या सर्व प्रकरणी सर्वोच्च न्यायालायत आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

वृक्ष तोडीविरोधात पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन तर पोलिसांचा चोख बंदोबस्त 

आरे मध्ये होणारे मेट्रो कारशेडचे काम थांबविण्यात यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली आहे. याचसाठी पर्यावरण प्रेमींकडून आरे मध्ये होणाऱ्या कमाविरुद्ध निषेध म्हणून आंदोलन सुद्धा कसरण्यात आलं होतं. पण पोलिसांकडून नंतर ते आंदोलन थांबविण्यात आलं आणि आंदोलन कर्त्यांना घरी पाठविण्यात आले. पोलिसांचा(mumbai polis) चोख बंदोबस्त सुद्धा आरे9aarey carshed) परिसरात ताणात करण्यात आलं होता. आरे मधील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. वनशक्ती संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा – arey carshed : आरे कारशेडच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही काम नाही – रणजित सिंह देओल

आरेतला मेट्रो कारशेडचा वाद    

मुंबई महानगर(bmc) पालिकेत गेली ३० वर्षे शिवसेनेचीच सत्ता आहे. याच महानगर पालिकेतील  वृक्ष प्राधिकरणाने आरे येथील झाडे तोडण्यास परवानगी दिली होती.   तर याबाबत परवानगीचे पत्रही महा नगरपालिकेने मेट्रो प्राधिकरणाला दिले होते. वृक्ष प्राधिकरण समितीत ही मंजुरी दिली जात असताना बराच गोंधळ झाला या गोंधळातच ही मंजूरी दिली गेली. त्यानंतर एका रात्रीत ‘आरे’मध्ये मेट्रो कारशेडच्या(aarey carshed) बांधणीसाठी 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करण्यास तर रात्रीच्या काळोखाचा आधार गेट ही वृक्ष तोड करण्यात आली. सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ‘आरे’कडे धाव घेतली आणि मोठं जनआंदोलन सुरु केले.

shinde - fadanvis

ठाकरे सरकार(thackeray govte) आल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती. त्यानंतर कांजूरमार्ग इथं कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मेट्रो कारशेडचा वाद न्यायालयाच्या दरबारी पोहोचला होता. पण याच दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या हातून राज्यातील सत्ता निघून गेली. मविआ सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस(shinde – fadnavis) सरकार येताच आरेमध्ये पुन्हा कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता आरे कारशेडला असलेली स्थगिती अधिकृतपणे उठवल्यानं तांत्रिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे आरेमध्ये कारशेडचं(aarey carshed0 बांधकाम पुन्हा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा – #AareyForest : रात्रीस खेळ चाले!

याच वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले आहेत त्यांनी नायायालयात धाव घेत कारशेडचे काम थांबविण्याची मागणी कारण्यात आली आहे. एकूणच  या सर्व प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात(supreme court) आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.