घरमुंबईम्हशी चोरणार्‍या चोरट्यांना अटक

म्हशी चोरणार्‍या चोरट्यांना अटक

Subscribe

पनवेल येथील दोन म्हशी कराड येथे नेऊन विक्री केलेल्या ठिकाणी त्यांची कत्तल होण्याच्या अगोदरच पनवेल शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकार्‍यांनी धाड टाकून म्हशींना जीवदान दिले आहे. यावेळी दुसर्‍या दिवशी यातील आरोपीला पुणे येथून अटक करण्यात आली.

पनवेल जवळील करंजाडे सेक्टर 3 गवळी वाडा येथील म्हशीच्या तबेल्यातून 3 लाख 32 हजार रुपये किंमतीच्या काळ्या रंगाच्या जाफराबादी दोन म्हशी चोरणार्‍या त्रिकुटापैकी दोघाजणांना वपोनि विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. फिर्यादी राकेश केसकर यांच्या गवळीवाडी येथील म्हशीच्या तबेल्यात असलेल्या 3 लाख 32 हजार रुपये किंमतीच्या दोन जाफराबादी म्हशी आरोपी विकास दिंडे, केशव दिंडे व अज्ञात वाहन चालक आपसात संगनमत करून बंद तबेल्याचे लॉक तोडून त्यावाटे तबेल्यामध्ये प्रवेश करून लबाडीच्या उद्देशाने त्यांनी चोरून नेल्या होत्या.

- Advertisement -

याबाबतची माहिती मिळताच वपोनि विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदाराकडून तांत्रिक तपास करून व सापळा रचून पाहिजे आरोपी विकास दिंडे व चांगदेव मराठे यांना कराड तालुक्यातील वाडवली गाव येथून पकडून त्यांच्याकडून चोरलेल्या म्हशी हस्तगत केल्या आहेत. न्यायालयाने सदर आरोपींना पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -