घरमुंबईमानखुर्दमध्ये भाजपच्या दोन गटात हाणामारी; दोन जण जखमी

मानखुर्दमध्ये भाजपच्या दोन गटात हाणामारी; दोन जण जखमी

Subscribe

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम मानखुर्दच्या मोहिते-पाटील नगर येथे आयोजित करण्यात आला होता.

जळगावच्या अमळनेरमधील भाजपच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्यासमोर केलेल्या राड्याची घटना ताजी असताना मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शनिवारी रात्री मुंबईतल्या मानखुर्द भागामध्ये भाजपच्या दोन गटामध्ये वादावादी झाली. मानापमानावरुन दोन गटात वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

मानापमानावरुन दोन गटात हाणामारी

भाजपकडून लोकसभा निवडणूकीच्या प्रचार जोरदार सुरु आहे. अशातच मुंबईमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे. निवडणूक प्रचारासाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम मानखुर्दच्या मोहिते-पाटील नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी आपल्या नेत्याचे नाव न पुकारल्यामुळे भाजपच्या एका गट संतप्त झाला. या गटाने थेट कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या पदाधिकाऱ्याला याबाबत जाब विचारला. यामध्येत दोन्ही गटामध्ये आधी शाब्दीक वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

पोलिसात अद्याप तक्रार नाही

या घटनेबाबात माहिती मिळाल्यानंतर मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घटास्थळी वातावरण शांत होते.. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणतिही तक्रार पोलिसात अद्याप तक्रार आलेली नसून तक्रार आल्यानंतर संबंधित व्यक्तिंवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे जळगावनंतर आता मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्याचे समोर आले आहे. आता यावर भाजपकडून नेमकी काय कारवाई केली जाईल हे पाहणे महत्वाचे आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

भाजपच्या मेळाव्यात फ्रीस्टाईल

भाजपचे संकचमोचक गिरीश महाजन यांना कार्यकर्ता मेळाव्यात धक्काबुक्की

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -