घरमुंबईमॅट्रीमोनियल साईटवर तरुणीची फसवणूक

मॅट्रीमोनियल साईटवर तरुणीची फसवणूक

Subscribe

भामटा इंजिनीयर तरुण गजाआड

सध्या लग्न जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल साइट्सचा वापर केला जातो. अनेक विवाह इच्छूक स्थळे या मॅट्रीमोनियल साईटवरून जुळवली जातात. पण या साईटवरून अनेक मुलामुलींची फसवणूकदेखील केली जात आहे. अशाच एका साईटवरून एका ३० वर्षीय तरुणीची २४ वर्षीय इंजिनीयर मुलाने फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला डी.एन. नगर पोलिसांनी अटक केलेली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

आरोपी विशाल चव्हाण हा इंजिनीयर असून मरोळ परिसरात वास्तव्याला होता. एका मॅट्रीमोनियल साईटवर त्याची तीस वर्षीय पीडित मुलीशी ओळख झाली होती. मुलीने ठेवलेल्या मागणीनुसार तिला हा मुलगा पसंद पडला आणि त्यानुसार दोघांच्यात दिवसेंदिवस संवाद वाढू लागला. पीडित मुलगी कांजुरमार्ग परिसरात राहत असल्याने दोघांनी मिळून घाटकोपर आरसीटी मॉलमध्ये भेटायचे ठरवले आणि त्याप्रमाणे भेट घेतली. यानंतर दोघांच्या वरचेवर भेटीदेखील होऊ लागल्या. आरोपी विशाल चव्हाणने तिला लग्न करण्याचा शब्द दिल्याने ती वरचेवर त्याच्याकडे लग्नाचा विषय काढत होती. मात्र, विशाल चव्हाण हा वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊन हा विषय टाळायचा. त्याचा मामा आजारी आहे त्यामुळे खर्च आहे आणि लग्न करू शकत नाही आपण नंतर ठरवू असा शब्द देऊन त्याने जवळपास ९० हजार रुपये पीडित मुलीकडून घेतल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. मध्यंतरी दोघांच्यात शारीरिक संबंधदेखील झाल्याने तिने त्याच्यावर बलात्काराचा आरोपदेखील केला आहे.

- Advertisement -

पंधरा दिवसांपासून विशाल चव्हाण याने मुलीशी बोलण्याचे बंद केले आणि मोबाईल बंद करून ठेवला. पीडितेला संशय आला आणि तिने प्रयत्न करून विशाल चव्हाण हिच्या बहिणीला संपर्क केला तेव्हा तिला धक्काच बसला. विशाल चव्हाणने पंधरा दिवसांपूर्वीच लग्न केले असल्याचे तिला समजले. त्यानुसार मुद्दाम लाडीगोडी लावून विशालला भेटायचे असल्याचे तिने सांगितले आणि त्याला तयार केले. त्यानंतर तिने त्याला अगदी प्रेमाचे नाटक करून डी.एन नगर पोलिसांकडे नेले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे फसवणूक आणि बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी विशाल चव्हाण याने मॅट्रीमोनियल साईटवरून मुलीशी जवळीक साधली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेगवेगळ्या कारणास्तव फसवणूक केली, अशी तक्रार आमच्याकडे आल्याने त्याला अटक केलेली आहे. या आरोपीने आणखी कोणाची अशाप्रकारे फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू आहे.
– परमेश्वर गमणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी.एन. नगर पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -