घरमुंबई...तर मी पुन्हा आत्महत्या करेन; भिवंडी राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षाचा इशारा

…तर मी पुन्हा आत्महत्या करेन; भिवंडी राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षाचा इशारा

Subscribe

मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक निवड समिती नेमण्यात आली असून या समितीने एक मताने शरद पवारांचा राजीनामा नामंजुर केला आहे. पण याआधी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर धक्कादायक घटना घडली आहे. कार्यालयाबाहेर जमा झालेल्या गर्दीतील भिवंडी राष्ट्रवादीचे युवा अध्यक्षाने (Youth President of Bhiwandi Nationalist Party) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्याने असे म्हटले की, जर साहेबांनी राजीनामा परत घेतला नाही, तर तुम्ही मला आता आत्मदहनापासून अडवले आहे, परंतु मी पुन्हा आत्मदहन करणार आहे. त्यामुळे आज युवा अध्यक्षाने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर शरद पवार आपला राजीनामा मागे घेणार का, हे पाहावे लागेल.

युवा अध्यक्ष म्हणाला की, ज्याप्रमाणे आपल्या मुलाच्या डोक्यावरून बापाचा हात बाजूला होतो, त्याचप्रमाणे शरद पवारांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरून बाजूला होणार आहे. आम्ही तीन दिवस साहेबांना समजवून सांगत आहोत. राजीनामा मागे घ्या, पण साहेब ऐकत नाही आहेत. त्यामुळे जर साहेबांनी राजीनामा मागे घतेला नाही, तर तुम्ही मला अडवले आहे, पण मी पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न करणार. शरद पवार आमचे नेते, आमचे अध्यक्ष, आमचे नेते, आमचे सर्व काही आहे, त्यामुळे आज जी बैठक होत आहे, त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असेही युवा अध्यक्ष म्हणाला.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पवारांच्या या घोषणेनंतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पवारांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली आहे. एकीकडे कार्यालयाच्याबाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे भजन-कीर्तन करण्यात येत आहे. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा. तसेच याबाबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -