घरताज्या घडामोडीमुंबईसाठी ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

मुंबईसाठी ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

Subscribe

११७ दिवस म्हणजे येत्या ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीपुरवठा आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या ४ लाख ५० हजार ९२८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पुढील ११७ दिवस म्हणजे येत्या ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. मुंबईत पावसाळ्याला जरी थोडा उशीर झाला तरी मुंबईकरांना पाण्याचे व पाणीकपातीचे टेन्शन घेण्याची गरज भासणार नाही. मुंबईला भांडुप संकुल परिसरातील विहार व तुळशी या अत्यंत कमी पाणी साठवण क्षमता असलेल्या दोन तलावांमधून आणि दिडशे किलोमीटर दूर अंतरावरील तानसा, मोडक सागर, उच्च वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या पाच तलावांमधून अशा एकूण सात तलावांमधून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

मुंबईला दरवर्षी पावसाळा संपल्यानंतरपासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांत मिळून एकूण ४ लाख ५० हजार ९२८ दशलक्ष लिटर म्हणजे एकूण पाणीसाठवण क्षमतेच्या ३१.१६% इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

- Advertisement -

यामध्ये, सर्वात जास्त पाणीसाठा हा भातसा तलावात आहे. या तलावात सध्या २ लाख ३७ हजार ५५१ दशलक्ष लिटर इतका म्हणजे तलावाच्या एकूण पाणी साठवण क्षमतेच्या ३३.१३% एवढा पाणीसाठा आहे. ते सर्वात कमी पाणीसाठा हा तुळशी तलावांत आहे. या तलावात सध्या ३ हजार ८४१ दशलक्ष लिटर इतका म्हणजे या तलावाच्या एकूण पाणीसाठवण क्षमतेच्या ४७.७४% इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

तलावातील पाणीसाठा

अप्पर ७५,७२६ ३३.३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मोडकसागर तलावात  ४४,६५३ ३४.६३ टक्के, तानसा तलावात ३१,६७२ २१.८३ टक्के, मध्य वैतरणात  ४३,२२८ २२.३४ टक्के पाणीसाठी आहे. त्याचप्रमाणे भातसा तलावात      २,३७,५५१ ३३.१३ टक्के, विहार तलावात १४,२५७ ५१.४७ टक्के तर तुळशी तलावात ३,८४१ ४७.७४ टक्के पाणीसाठा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये पुन्हा मोफत धान्य देण्यावर विचार – छगन भुजबळ  

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -