घरमुंबईमुंबईत कोरोनाचा नवा स्ट्रेन नाही - काकाणी

मुंबईत कोरोनाचा नवा स्ट्रेन नाही – काकाणी

Subscribe

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत असली तरी पालिकेने कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वप्रकारे यंत्रणा सुसज्ज ठेवली असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

मुंबईत यापूर्वी कोरोना युके स्ट्रेनचे ५ रुग्ण आढळले होते. नंतर योग्य उपचारानंतर ते सर्व बरे झाले. त्यानंतर एकही नवीन स्ट्रेनचा एकही रुग्ण मुंबईत आढळून आलेला नाही. मात्र जे काही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येतात त्यापैकी ९० रुग्णांचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तसेच, मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत असली तरी पालिकेने कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वप्रकारे यंत्रणा सुसज्ज ठेवली असल्याचे काकाणी यांनी सांगितले. सध्या लग्नाच्या निमित्ताने मंगल कार्यालयात गर्दी होताना दिसते. तसेच, हॉटेल्सच्या ठिकाणीही गर्दी वाढताना आढळून आल्याने पालिकेने आता या हॉटेल्स आणि मंगलकार्यालयाच्या ठिकाणी कडक गर्दीला रोखण्यासाठी कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या ठिकाणी होणारया बुकिंगची माहिती घेण्यात येईल.तसेच, जर ५०% पेक्षाही जास्त गर्दी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची गंभीर दखल राज्य शासन व मुंबई महापालिकेने घेतली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत गणेशोत्सवानंतर जितके रुग्ण वाढले त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. कोविड सेंटर, व्हेंटीलेटर आदी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असे काकाणी यांनी सांगितले. दाटीवाटीच्या वस्तीत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येण्याची शक्यता असल्याने रुग्णांना क्वारंटाईन करता यावे म्हणून पालिकेच्या प्रत्येक २४ विभागात एक अशी २४ क्वारंटाईन सेंटर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहीत काकाणी यांनी दिली.

- Advertisement -

कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणावर वेगळाच परिणाम होत असून लसीकरणाचा वेग काहीसा मंदावतो आहे, असे काकाणी यांनी सांगितले. सदर Appमुळे उद्भवलेल्या अडचणी तात्काळ उपाययोजना करून दूर करण्यात याव्यात, अशी विनंती केंद्र व राज्य सरकारला केल्याचे काकाणी यांनी सांगितले. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता क्रिकेट खेळाडूंची गर्दी होत असलेल्या हायकोर्ट समोरील ‘ओव्हल मैदान’ २६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, इतर मैदानांबाबत पाहणी करून आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांप्रमाणे खासगी कार्यालयात ५० टक्के स्टाफ असावा या नियमाचे पालन केले जावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकाराक आहे. ५० टक्के उपस्थितीचे नियम पाळले जातात का याची पाहणी करण्यासाठी पालिकेचे पथक आता खासगी कार्यालयांना भेटी देऊन कारवाई करणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: मुंबईत Lockdown अटळ, कोरोना रुग्णांनी पार केला हजाराचा आकडा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -