घरमुंबईमुंबईच्या काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा नाही

मुंबईच्या काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा नाही

Subscribe

पालिकेच्या एस विभागामध्ये दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही, तर ‘के पूर्व’,‘एच पूर्व’,‘एल’ व ‘जी उत्तर या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जय अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम मुंबई महापालिकेच्या जल अभियंता व पाणीपुरवठा प्रकल्प खात्याकडून ९ व १० डिसेंबरला हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या एस विभागामध्ये दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही, तर ‘के पूर्व’,‘एच पूर्व’,‘एल’ व ‘जी उत्तर या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जय अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेचे जल अभियंता व पाणीपुरवठा प्रकल्प खाते अव्याहतपणे कार्यरत असते. या खात्यांद्वारे जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम, तसेच नवीन जलवाहिनी कार्यान्वित करताना ती गरजेनुसार योग्य त्या आकाराची असेल याचीही काळजी घेतली जाते. त्यानुसार सुमारे ४ किलोमीटर लांबीची व १८०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम ९ व १० डिसेंबरला हाती घेण्यात येणार आहे. जुन्या जलवहिनीच्या जागी गरजेनुसार २४०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस पालिकेच्या ‘एस’ विभाग क्षेत्रातील काही परिसरांमध्ये आणि ‘के पूर्व’, ‘एच पूर्व’, ‘एल’ व ‘जी उत्तर’ या ४ विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

- Advertisement -

‘एस’ विभाग

डक लाईन, राजाराम वाडी, श्रीराम पाडा, खिंडीपाडा, टेंभीपाडा, सोनापुर, तुलशेतपाडा, प्रताप नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सुभाष नगर, द्राक्षबाग, उत्कर्ष नगर, राजदीप नगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा, आंब्याची भरणी, रावते कंपाऊंड, राम नगर, पासपोली गाव, मोरारजी नगर, गांवदेवी टेकडी, सर्वोदय नगर

‘के पूर्व’ विभाग

चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत तसेच उंच भागात परिणाम होईल. ओम नगर, क्रांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर, सहार गाव, सुतार पाखाडी, विजय नगर मरोळ परिसर, सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

- Advertisement -

‘एल’ विभाग

कुर्ला उत्तर परिसर, बरेली मस्जिद, ९० फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरी-मरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गलगतचा परिसर, सत्य नगर पाईपलाईन तसेच उंच भागात परिणाम होईल.

‘जी उत्तर’ विभाग

धारावी परिसर – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग, प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

एच पूर्व’ विभाग

वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -