घरमुंबईश्री सदस्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न होता, मात्र दोन दिवसांमध्ये वातावरण...

श्री सदस्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न होता, मात्र दोन दिवसांमध्ये वातावरण बदलले- उदय सामंत

Subscribe

मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी (16 एप्रिल) पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला गालबोट लागले आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला आणि काही श्री सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले. मृत पावलेल्या श्री सदस्यांची संख्या आता १३ वर पोहोचलेली आहे. अशात आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या सोहळ्याबद्दल माहिती दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, या सोहळ्यासाठी 150 नर्स, 73 साध्या रुग्णवाहिका  आणि 19 कार्डियक होत्या. अमराईमध्ये 4000 बेडचे रुग्णालय तयार केले होते. एमआयजी कामोठे, अपोले मेडिक्वोर फोर्टीज टाटा हॉस्पिटल याठिकाणी सुद्धा बेड्स राखीव ठेवण्यात आले होते. याशिवाय वैद्यकीय बुथ ठेवण्यात आले होते आणि सेशन अधिकारी तसेच पिएसीचे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यता आली होती, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या सोहळ्याला श्री सदस्यांना पोहण्यासाठी रेल्वे स्टेशनवरून यायला आणि जायला जवळपास 1050 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये बीएमसी, डीएमसीच, नवी मुंबई पालिका, मिरा-भाईंदर आणि पनवेल महानगरपालिका या बसेसी सुविधा होती, असे उदय सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, या मैदानाच्या आसापास पार्किंगसाठी पुर्वी 4 ठिकाणी व्यवस्था होती, मात्र यावेळी 21 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

ते म्हणाले की, श्री सदस्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्फत करण्यात आला होता. पण त्या दोन दिवासंमध्ये वातावरण बदलले आणि तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढले. त्यामुळे श्री सदस्यांना उष्णघाताचा त्रास झाला, असे उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

या सोहळ्यासाठी वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यामध्ये ब्लड बँक, प्राथमिक उपचाराला लागणारी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज करण्यात आली होती, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. त्यांनी सांगितले की, हॉस्पिटलकडून मला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार एमजीएम कळंब 13, एमजीएमल 3, भारतीय हॉस्पिटल 1 आणि डीव्हाय पाटील नेरूळमध्ये 1 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे, तर टाटा हॉस्पिटल 8, भारतीयमध्ये 2, डी व्हाय पाटील नेरूळमधून 14 आणि ज्युपीटरमधून 1 अशा पद्धतीने श्री सदस्यांना डीस्चार्ज देण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -