घरमुंबईमुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, 45.02 मिमी इतक्या पावसाची नोंद

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, 45.02 मिमी इतक्या पावसाची नोंद

Subscribe

मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग केली. शहरात 45.02 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

मुंबई – मुसळधार पावसाने मंगळवारी शहर व उपनगर भागात जोरदार बॅटिंग केली. पश्चिम उपनगर भागात सर्वात जास्त म्हणजे ५३.६३ मिमी इतक्या पावसाची, शहर भागात ४५.०२ मिमी तर पूर्व उपनगरात – ४३.७२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सकाळच्या सुमारास पावसाचा जोर जास्त होता. दुपारी काहीशी विश्रांती घेतल्यावर सायंकाळी पुन्हा पावसाने जोरदार बरसात केली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतही चांगला पाऊस पडल्याने तलावातील पाणीसाठयात चांगलीच वाढ झाली.

रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम नाही –

- Advertisement -

सुदैवाने रेल्वे व रस्ते वाहतुकीवर या पावसाचा विपरित परिणाम झाला नाही. मात्र, सखल भागात कुठेही पावसाचे पाणी साचले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र जोरदार पावसामुळे पाण्याचा निचरा वडाळा, अंधेरी सब वे आदी भागात काहीसा मंद गतीने झाला, असा दावाही पालिकेने केला आहे.

पश्चिम उपनगरात पावसाचा जोर –

- Advertisement -

सर्वात जास्त पश्चिम उपनगरातील कांदिवली येथे ८३ मिमी, चिंचोळी -७८ मिमी, दहिसर -७६ मिमी तर बोरिवली येथे ,७५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच, शहर भागातील महालक्ष्मी, हाजीअली परिसरात सर्वात जास्त म्हणजे ६१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर, दादर भागात – ५९ मिमी, भायखळा – ५६ मिमी, मलबार हिल -५५ मिमी आणि वडाळा भागात ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे, पूर्व उपनगरात भांडुप संकुल येथे ४६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच, विक्रोळी – ४० मिमी, चेंबूर – ३९ मिमी तर शिवाजी नगर, गव्हाण पाडा भागात – ३५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

आगामी २४ तासात जोरदार ते अति जोरदार दिवसाची शक्यता –

आगामी २४ तासात मुंबई शहर व उपनगरे येथील काही भागात मध्यम, जोरदार ते क्तओ जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

१४ ठिकाणी झाडे/ फांद्यांची पडझड –

जोरदार पावसाच्या तडाख्यात शहर भागात ३ ठिकाणी, पूर्व उपनगर भागात – ३ ठिकाणी तर पश्चिम उपनगरे भागात ८ ठिकाणी अशा एकूण १४ ठिकाणी झाडे/ फांद्या यांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या घटनांत कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. तसेच, मुंबईत दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये कोणीही जखमी नसल्याचे समजते. तर, पश्चिम उपनगरात ४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या असून त्यामध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -