गणरायाचे आगमन झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता गणेशाच्या विसर्जनाचे दिवस जवळ आले आहेत. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आता मुंबईतील तलावं सज्ज झाली आहेत. पोलिसांचा मोठा पहाराही असणार आहे. महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांचा लोंढा येत असतो. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच, काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. (These roads in Mumbai will be closed on Anant Chaturdashi Know in detail)
‘हे’ मार्ग वाहतुकीसाठी बंद
नाथालाल पारेक मार्ग, कॅप्टन प्रकास पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन, जे.एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाळकेश्वर रस्ता, पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस. अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन.एम. जोशी मार्ग, बी. जे. मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलान आझाद रोड, बेलासिस रोड, मौलाना शौकत अली रोड, डॉक्टर बी. ए. रोड, चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल, 60 फिट रोड, मोहिम सायन लिंक रोड, टी.एच. कटारिय मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल.बी. एस.रस्ता, न्यू मिल रोड, संत रोहिदास मार्ग.
(हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; अनंत चतुर्दशी ते गांधी जयंतीपर्यंत सलग सुट्या )