घरमुंबईआमचे ऐकले असते तर ते पाण्यात बुडालेच नसते

आमचे ऐकले असते तर ते पाण्यात बुडालेच नसते

Subscribe

जुहू चौपाटी युवक पाण्यात डुबल्याची दुर्घटना घडली. समुद्राला भरती असल्याने त्यांना अडवले होते. मात्र त्यांनी लाईफागार्डचे ऐकले नाही. जर ऐकले असते तर ते पाण्यात डुबलेच नसते.

जुहू चौपाटी येथे पाच युवक पाण्यात डुबल्याची दुर्घटना गुरुवारी घडली. समुद्राला भरती असल्याने आम्ही त्यांना अडवले होते. मात्र त्यांनी आमचे ऐकले नाही. आमचे त्यांनी ऐकले असते तर ते पाण्यात डुबलेच नसते, अशी माहिती नायझल क्रिएडो या लाईफागार्डने दिली.

तुम अपना काम करो

बेवॉच लाईफगार्ड असोसिएशनचा मी सदस्य असून जुहू चौपाटीवर जे डब्लू मॅरिएट हॉटेलच्या मागच्या बाजूस असलेल्या चौपाटीवर आम्ही लाईफगार्ड म्हणून काम करतो. गुरुवारी माझी सायंकाळी ५ वाजताची शिफ्ट होती. मी लवकरच बीचवर गेलो होतो. बीचवर इतर लाईफगार्ड बरोबर बसलो असताना सहा – सात मुले पाण्याकडे जाताना दिसली. आमच्यापैकी मंगेला नावाच्या लाईफगार्डने त्यांना पाण्यात जाऊ नका. समुद्राला भरती असल्याचे सांगितले. मात्र या मुलांनी ‘तुम अपना काम करो’ असे बोलून पाण्यात गेले.

- Advertisement -

त्यांच्यापैकी एकजण बाहेर बसला होता तो ‘बचाव, बचाव’ मेरे दोस्त डूब रहे है असे तो ओरडू लागला. आम्ही पळत त्या ठिकाणी धावत पोहचलो माझ्यासोबत रायबक सूत्री, इतर लाईफगार्ड व स्थानिक नागरिक होते. आम्ही कमरेला दोरखंड बांधून कमरेपेक्षा उंच उसळणार्‍या लाटांना मागे टाकत पाण्यात शिरलो आणि वसीम खान याला बाहेर काढले. आमच्याकडे बचावाचे इतर साहित्य नसल्याने आम्ही मोठ्या पाण्यात जाऊन इतरांना वाचवू शकलो नाही, अशी खंत नायझल यांने व्यक्त केली. दोन दिवसापूर्वीच आम्ही दोघांना वाचवून पोलिसांकडे दिल्याचे नायझल याने ‘माय महानगर’ शी बोलताना सांगितले.

सुविधा असत्या तर वाचवता आले असते

आमच्याकडे पालिकेच्या लाईफगार्डप्रमाणे सुविधा असत्या तर इतरांनाही वाचवता आले असते असे संघटनेचे अध्यक्ष सईद उमर शमा यांनी सांगितले. पालिकेच्या लाईफगार्डला रेस्क्यू बोट, जेटस्की देण्यात येतात या बोटी कोणी पाण्यात बुडल्यावर किंवा मेल्यावर काढल्या जातात. अशा सुविधा चौपाट्यांवर आमच्यासारख्या सामाजिक काम करणार्‍या संस्थेच्या लाईफगार्डना उपलब्ध करून दिल्यास अनेकांचा जीव वाचवणे शक्य असल्याचे शमा यांनी सांगितले.

- Advertisement -

प्लास्टिकमुळे मृत्यू

जुहू चौपाटीवर वाहून गेलेल्या पाच युवकांचा मृत्यू पाण्यात डुबून झाला नसून पाण्यात जमा असलेल्या प्लास्टिकमुळे झाला, असा गौफ्यस्फोट नायझल याने केला. वसीम खान याला वाचवल्यानंतर दोन जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला तेव्हा अंगाला प्लास्टिक गुंडाळले होते. एकाच्या अंगावर एकही कापड नव्हता फक्त प्लास्टिकच होते, असे नायझल याने सांगितले.

juhu beach
जुहू चौपटी

समाजसेवा म्हणून लाईफगार्ड

बेवॉच लाईफगार्ड असोसिएशन या संघटनेचे लाईफगार्ड इतर ठिकाणी नोकरी करतात. सर्व लाईफगार्ड याच विभागात राहतात. आपल्या कामातून मिळालेल्या वेळात ते लाईफगार्डचे काम करतात. राष्ट्रीय लाईफ सेवा सोसायटीकडून त्यांना लाईफगार्डचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. मी व आमचे उपाध्यक्ष बंटी राव दोघे फोटोग्राफर आहोत. वासिमला वाचवणारा नायझल क्रिएडो एका मोठ्या कंपनीच्या कार्यालयात नोकरीला आहे. तर वासिमला वाचवण्यास मदत करणारा रायबक सूत्री हा इंडिगो एअरलाइन्समध्ये कामाला आहे. आम्हाला सरकार किंवा पालिकेने चांगल्या सुविधा दिल्यास आणखी चांगल्या प्रकारे काम करता येईल. आम्ही गेले १२ वर्ष जुहू चौपाटी येथील जे डब्लू मॅरिएट येथे लाईफ गार्डची सेवा देता आहोत.

– सईद शमा, अध्यक्ष, बेवॉच लाईफगार्ड असोसिएशन.

पालिकेच्या लाईफगार्डना सुविधा

मुंबईतील वर्दळीच्या जुहू, वर्सोवा, दादर, गिरगाव, अक्सा या ५ समुद्र किनार्‍यांवर ३६ लाईफगार्ड तैनात आहेत. त्यांना आवश्यक असलेले लाईफ जॅकेट, दोर, रिंग बॉईज, सायरन व मेगाफोन दिले जातात. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी किंवा ४.३० मीटरपेक्षा मोठ्या लाटा उसळणार असतील तर बोट दिली जाते. पालिकेच्या सेवेत ११ लाईफगार्ड असून त्यांना दरमहा २२ ते २३ हजार पगार दिला जातो. तर २५ जणांपैकी काही लाईफगार्ड पावसाळ्याच्या काळात कार्यरत असतात. त्यांना दरमहा ९६०० तर वर्षभर लाईफगार्ड म्हणून कार्यरत असलेल्याना दरमहा १२ हजार रुपये पगार दिला जातो.

sikandar khan
सिकंदर खान

दोन दिवस मूलची वाट पाहतोय

माझा मुलगा फैजल खान (१७) याला दहावीला ८५ टक्के मार्क्स मिळाले होते. तो मौलाना आझाद कॉलेजमध्ये शिकत होता. गुरुवारी दुपारी खाली खेळायला जातो असे सांगून गेला. बाजूलाच राहणारा एक मुलगा वाचला. त्याच्याकडून माझा मुलगाही बुडाल्याचे समजले. गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून चौपाटीवर त्याची वाट पाहत आहे. तीन जणांचे मृतदेह मिळेपर्यंत सर्व नीट होते. मात्र शुक्रवारी दुपारपासून शोधकार्याची गती धीमी झाली.

– सिकंदर खान


– अजेयकुमार जाधव

juhu beach incidentपाच मिनिटांत येतो, असे आजीला सांगून गेला तो परत आलाच नाही

‘दादी पांच मिनिट में आता हूँ’ असे सांगून घराबाहेर पडला तो परत आलाच नाही, असे सांगत नाझीरचे वडील रफिफ म्हेतर धाय मोकलून रडू लालगले. वयात येत असलेला मुलगा असा अचानक सोडून गेल्याने रफिक म्हेतर धाय मोकलून रडू लागले. वयात येत असलेला मुलगा असा अचानक सोडून गेल्याने रफिक म्हेतर धाय मोकलून रडू लागले. वयात येत असलेला मुलगा असा अचानक सोडून गेल्याने रफिक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

पुन्हा परतलाच नाही

विलेपार्ले येथील गावदेवी डोंगरीतील अजमेरी मोहल्ला येथे राहणारा नाझीर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घरात आला. मोबाईल चार्जिंगला लावला आणि आजीला मी पाच मिनिटांत जाऊन येतो, असे सांगत घरातून बाहेर पडला त्यानंतर त्यांनी मित्रांसोबत घरासमोर असलेल्या अजमेरी मस्जिदच्या आवारात जाळी बसवण्याचे काम केले. बराच वेळ हे काम केल्यानंतर सर्व मित्रांनी जुहू आंघोळीला जाण्याचे ठरवले. त्यानुसार सर्व मित्र तीनच्या सुमारास जुहू चौपाटीवर गेले, असे रफिक यांनी सांगितले. नाझीर दहावी नापास झाल्याने त्याला एका मित्राच्या कपड्याच्या दुकानात कामाला ठेवले होते. जेणेकरुन काही काम करुन तो स्वत:च्या पायावर उभा राहील. पण त्याच्या अशा अचानक जाण्याने मात्र सर्वत्र विस्कटले, असे रफिक यांनी सांगितले.

नेमके काय घडले?

पार्ल्याच्या अजमेर मस्जिदमध्ये जाळी बसवण्याचे काम केल्यानंतर दुपारी फैजल सिकंदर (१७), नाझीर म्हेतर (१७), फरदीन सौदागर (१६), सोहेल खान (१७), वसीम खान (२२) आवेज शेख (१६) व मी असे आम्ही सातजणांनी जुहू चौपाटीवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे आदिल शेख ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगत होता. जुहू चौपाटीवर आंघोळीला गेल्यानंतर आमच्यापैकी आवेजला पोहता येत नसल्याने तो किनार्‍यावर उभा राहिला तर आम्ही सहाजण एकमेकांचे हात पकडून साखळी करून पाण्यात गेलो. थोडेसे आत गेल्यावर पाणी आत खेचत असल्याचे माझ्या लक्षात आले. तसे मी वसीमला सांगितले. त्यावर त्याने तू बाहेर जा असे सांगत माझा हात सोडला. त्यामुळे मी पाण्यात दोन तीन गटांगळ्या खाल्ल्या व बाहेर येण्यासाठी माघारी फिरलो. मी बाहेर येत असताना आवेज आरडाओरडा करायला लागला. त्यामुळे मी मागे वळून पाहिले असता वसीम गटांगळ्या खात होता तर बाकीचे कोणीच दिसत नव्हते. त्यानंतर मी व आवेजने आरडाओरडा केल्याने लाईफगार्डने धाव घेऊन वसीमला वाचवले. पण अन्य चारजण बुडाले, असे आदिल शेख सांगत होता.

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -