Homeक्राइमMumbai Crime : घरात चोरण्यासाठी काहीच न मिळाल्याने चोरट्याने केले असे काही....,...

Mumbai Crime : घरात चोरण्यासाठी काहीच न मिळाल्याने चोरट्याने केले असे काही…., पोलीसही चक्रावले

Subscribe

चोरीच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. मात्र मुंबईतील मालाडमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. मात्र त्याच्या हाताला काहीच लागले नाही. त्यामुळे चोराने घरात एकट्याच असलेल्या महिलेच्या गालाचा मुका घेतला आणि तिथून पळ काढला.

मुंबई : चोरीच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. मात्र मुंबईतील मालाडमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. मात्र त्याच्या हाताला काहीच लागले नाही. त्यामुळे चोराने घरात एकट्याच असलेल्या महिलेच्या गालाचा मुका घेतला आणि तिथून पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केली, मात्र नंतर त्याला ताकीद देऊन सोडून देण्यात आले. मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. (Thief kiss woman cheek after finding nothing to steal in house)

38 वर्षीय पीडितेने कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने तक्रारीत म्हटले होते की, मी घरी एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश करत आतून दरवाजा बंद केला. यानंतर त्याने माझे तोंड दाबत धमकावले आणि सर्व मौल्यवान कुठे आहेत? अशी विचारणा केली. आरोपीने माझ्याकडे रोख रक्कम, मोबाइल आणि एटीएम कार्ड देण्याची मागणी केली. मात्र घरात कोणतीही मौल्यवान वस्तू नसल्याचे मी त्याला सांगितले. यानंतर आरोपीने घरात पुन्हा काही मौल्यावान वस्तू मिळतात का? हे शोधण्याचा प्रयत्न न करता माझ्या गालाचा मुका घेतला आणि तिथून पळ काढला.

- Advertisement -

हेही वाचा – Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानक महिलांसाठी असुरक्षित? भरदिवसा माथेफिरूने कापले तरुणीचे केस

महिलेच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विनयभंग आणि दरोड्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली एका व्यक्तीला सायंकाळी अटक करण्यात आली. संबंधित आरोपी हा त्याच भागातील रहिवासी आहे. तो आपल्या कुटुंबासह पीडितेच्या घराजवळ राहतो. या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे समोर आले. तसेच आरोपी हा बेरोजगार आहे. घरात किमती मुद्देमाल न सापडल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला ताकदी देऊन सोडून देण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Nashik Crime : मुलाच्या लग्नास अवघे २० दिवस शिल्लक असतानाच आई-वडिलांची आत्महत्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -