घरमुंबईपोस्ट शेअर करताय... ही दक्षता घ्या !

पोस्ट शेअर करताय… ही दक्षता घ्या !

Subscribe

मुंबईकरांना आता पावसात बाहेर पडताना छत्री, रेनकोटसोबतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झालीये. बरेचदा पोस्ट दिसली की ठोक लाईक करत अनेकांकडून त्या पोस्ट लाईक केल्या जातात. शेअर केल्या जातात. एखादी पोस्ट शेअर करताना किती खरी आहे. त्या पोस्टची विश्वासार्हता तपासणे तितकेच गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस पडायला सुरुवात झालीये. उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाने दिलासा दिला आहे. पण थोडंस नजीकच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर पावसाळ्यातील काही कटू आठवणी आजही अनेक मुंबईकरांच्या मनात घर करून आहे. मग ती आठवण २६ जुलै २००५ ला झालेल्या मुसळधार पावसाची असो की, गेल्यावर्षी २९ ऑगस्टला झालेला पाऊस असो. मुंबईकरांना आता पावसात बाहेर पडताना छत्री, रेनकोटसोबतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झालीये. बरेचदा पोस्ट दिसली की ठोक लाईक करत अनेकांकडून त्या पोस्ट लाईक केल्या जातात. शेअर केल्या जातात. एखादी पोस्ट शेअर करताना किती खरी आहे. त्या पोस्टची विश्वासार्हता तपासणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे फेसबुक, ट्विट्ऱवर येणाऱ्या पोस्ट तितक्याच काळजीपूर्वक शेअर करणे गरजेचे आहे.

१.पोस्ट शेअर करताना माहितीचा स्रोत तपासा

- Advertisement -

पावसाळ्यामुळे झालेल्या एखाद्या दुर्घटनेची पोस्ट खात्री केल्याशिवाय शेअर करु नका कोणतीही पोस्ट शेअर करताना माहितीचो स्रोत तपासा. खात्रीसाठी वेबसाइट आणि त्यांचं सोशल मीडिया हँडल चेक करा

- Advertisement -

२.वर्दीतल्या व्यक्तीना सहकार्य करा
पावसात अडकल्यावर चिडचिड करू नका. गोंधळून जाऊ नका. राग हा सोशल मीडियावर एखाद्या पोस्टमधून व्यक्त करू नका. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर आपण एका खाकी वर्दीतल्या कर्तव्यदक्ष पोलिसांचा व्हिडिओ पाहतच आहोत. ते त्यांचं काम हे कर्तव्यदक्षपणे निभावत असतात. विनाकारण चीडचीड करू नका.

३.खात्रीलायक पेजेसवर विश्वास ठेवा
मुंबई पोलिसांच्या ऑफिशियल ट्विट्ऱ हँडलला फॉलो करा. जुने स्क्रीनशॉट शेअर न करता त्यांनी केलेले ट्विट रिट्विट करा.

४.योग्य व्यक्तींकडून खात्री करून घ्या
सोशल मीडिया किंवा मित्र-मैत्रिणींच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर एखाद्या समस्येविषयी जाणून घेणं कधीही चांगलच. परंतु खात्रीलायक स्रोत असलेल्या व्यक्तीना विचारणं कधीही चांगलं

 

५.राजकीय जोक्स हे कायम होतच असतात पण तोच हॅशटॅग वापरून त्यात भर घालू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -