घरCORONA UPDATEthird wave of corona : मुंबईत तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी ; ७४८ आयसीयू,...

third wave of corona : मुंबईत तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी ; ७४८ आयसीयू, ४०९९ ऑक्सिजन बेड

Subscribe

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नुकताच पूर्व इशारा दिला आहे. त्यानुसार मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेने बीकेसी, दहिसर, सोमय्या, कांजूरमार्ग, मालाड जंबो सेंटरमध्ये पूर्वतयारीचा भाग म्हणून ४ हजार ९ ऑक्सिजन बेड, ७४८ आयसीयू बेड, ६८४ नॉन ऑक्सिजन बेड, १०० पेडीयाट्रिक आयसीयू बेड, १०० पेडीयाट्रिक बेड, २० डायलिसिस, ४० ट्राएज आयसीयू बेड अशा एकूण ५ हजार ७९१ बेडसची व्यवस्था केली आहे.

यामध्ये, आयसीयू बेडसची संख्या ८,८८ एवढी आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. पालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता मावळली असल्याचे न्यायालयात नुकतेच सांगितले होते. मात्र आता पुन्हा तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केल्याने भाजप, विरोधी पक्ष यांच्याकडून या प्रस्तावावर खरमरीत चर्चा होण्याची व पालिकेला जाब विचारला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सच्या सहकार्याने विविध उपाययोजना राबवत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवून मुंबईकरांना चांगला दिलासा दिला. तसेच, कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतर लॉकडाऊन लागू करताना घातलेल्या निर्बंधात काहीशी शिथिलता आणून नागरिकांना, व्यापारी बांधव आदींना काहीसा दिलसा दिला. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नसल्याने राज्य सरकार व पालिका यंत्रणा अलर्ट आहेत.

मुंबईत सध्या दहिसर, नेस्को गोरेगाव, बीकेसी, एनएससीआय वरळी, मुलुंड, रिचर्डसन अँड क्रुडास भायखळा अशी सहा जंबो कोरोना सेंटर कार्यरत आहेत. या ठिकाणी उपलब्ध १६ हजार बेडपैकी फक्त १७०० बेडवर केवळ ११ टक्के पेशंट उपचार घेत आहेत. तसेच, मालाड व कांजूरमार्ग जंबो कोरोना सेंटर पालिकेच्या ताब्यात असून शीव येथेही सेंटर सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.


समांथाशी जवळीक वाढवल्याने स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरला ठार मारण्याची धमकी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -