घरमुंबईरमाबाईची भूमिका साकारणाऱ्या 'या' अभिनेत्रीला कोरोनाची लागण

रमाबाईची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लागण

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ती रसिकप्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चालला आहे. या कोरोनाच्या विळख्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अडकले आहेत. यांच्यासोबत आता अभिनेत्री शिवानी रांगोळे हिला ही कोरोनाचा फटका बसला आहे. तिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. यासंबंधी माहिती तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे प्रेक्षकांना दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती अशी म्हणाली आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन केले असून योग्य ती सर्व काळजी घेत आहे आणि माझ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहे. ज्यांना बाहेर जावं लागत आहे. त्यांनी कृपया स्वत: ची काळजी घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वरच्छता तुमच्या हातात नाही पण तुमच्या आरोग्यासोबत कोणतीही तडजोड करु नका यासोबतच शिवानीने सर्वांना घरी राहण्याचा सल्लादेखील दिला आहे.

- Advertisement -

शिवानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत रमाबाईची भूमिका साकारत होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली आहे. तिच्या या भूमिकेसाठी तिला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळला आहे. या भूमिकेमुळे अनेकजण शिवानीचे चाहते झाले आहेत. शिवानी सध्या सांग तू आहेस ना या मालिकेत वैभवी हे पात्र साकारत होती. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आहे. तिने यापूर्वी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.


हे वाचा- ‘उगादी’ नववर्षाच्या शुभमुहूर्तां निमित्त दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीने केले तब्बल 8 आगामी चित्रपटांचे पोस्टर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -