घरCORONA UPDATECoronaVirus: 'हा' App क्वारंटाईन व्यक्तीवर लक्ष ठेवणार!

CoronaVirus: ‘हा’ App क्वारंटाईन व्यक्तीवर लक्ष ठेवणार!

Subscribe

आता क्वारंटाईन व्यक्तींचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी खास अॅप तयार केला आहे.

संशयित कोरोनाग्रस्त व्यक्तींना सरकारकडून क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र हे व्यक्ती घरामध्ये बंदिस्त न राहता बाहेर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवणे जिकरीचे झाले आहे. पण आता या व्यक्तींवर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे. आयआयटी मुंबईतील संशोधकांनी कोरोनटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अॅप तयार केले आहे.

या अॅपमध्ये असणार क्वारंटाईन व्यक्तीची माहिती

देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. संशयित कोरोनाग्रस्तांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. या नागरिकांना किमान १४ दिवस घरात राहणे बंधनकारक आहे. पण क्वारंटाईनचा हातावर शिक्का मारल्यानंतरही अनेकजण घरामध्ये सर्रासपणे फिरताना आढळून येत होते. त्यामुळे या नागरिकांवर लक्ष ठेवणे हे सरकारसाठी अवघड ठरले होते. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईतील प्राध्यापक आणि काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विशेष अॅप तयार केले आहे. या अॅपचे नाव क्वारंटाईन असे ठेवण्यात आले आहे. हे अॅप प्रशासनाला वापरासाठी सोईस्कर ठरणार आहे. यामध्ये क्वारंटाईन व्यक्तीची सर्व माहिती भरल्यानंतर त्या व्यक्तीला ज्या जागेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे ती माहिती भरायची आहे. जेणेकरून अॅपमध्ये त्या व्यक्तीचे भौगोलिक मर्यादा तयार होते. भौगोलिक मर्यादा तयार झाल्याने त्या व्यक्तीची क्वारंटाईन झोन निश्चित होते. या झोनमधून ती व्यक्ती बाहेर पडल्यास अॅपच्या माध्यामातून तातडीने प्रशासनाला मेसेज आणि ई-मेलद्वारे माहिती जाईल. ज्यामुळे क्वारंटाईन व्यक्तीला तातडीने रोखणे शक्य होणार असल्याची माहिती, आयआयटी मुंबईतील कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग विभागाचे प्रो. गणेश रामकृष्णन यांनी दिली.

- Advertisement -

या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार

क्वारंटाईनव्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेले अॅप https://corontine.in. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अॅपच्या वापरासंदर्भात सध्या विविध महापालिका आणि राज्य सरकारसोबत चर्चा सुरू आहे. हा अॅप सरकारी संस्थांना सहज वापरता येणारा असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या घटकांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली.


हेही वाचा – CoronaVirus: १४ दिवसांमध्ये साडेपाच हजार ठिकाणी केली जंतुनाशक फवारणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -