…यामुळे मुंबईतील एका कंपनीने फेकले २६ टन आईस्क्रीम!

this company not get permission to distribute free threw away 26 tonnes of ice cream
...यामुळे मुंबईतील एका कंपनीने फेकले २६ टन आईस्क्रीम!

लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील एका कंपनीला २६ टन आईस्क्रीम फेकू द्यायची वेळ आली आहे. कंपनीने बीएमसी आणि पोलिसांकडून मोफत आईस्क्रीम वाटण्यासाठी परवानगी मागितली होती, परंतु कोरोनामुळे हे होऊ शकते नाही. यानंतर आईस्क्रीम संपवण्यासाठी कंपनीने दुसऱ्या फर्मकडे संपर्क साधला.

कंपनीचे म्हणणे आहे की, हे त्याच्या दर्जेदार आईस्क्रीमचे उत्पादन होते. मुंबईच्या नॅचरल आईस्क्रीमच्या फॅक्ट्रीमध्ये ४५ हजार छोटे बॉक्समध्ये पॅक केलेले २६ टन आईस्क्रीम दुकानमध्ये जाण्यासाठी तयार होते. परंतु महाराष्ट्र सरकारने १९ मार्च रोजी राज्यात २० मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. कंपनीसाठी हा मोठा धक्का होता. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आईस्क्रीमचा खप खूपच कमी झाला होता.

नॅचरल आईस्क्रीमचे उपाध्यक्ष हेमंत नाईक म्हणाले की, ‘आमचे उत्पादन एक्सपायर झाल्यानंतर त्याचा काय वापर होऊ शकतो, असे कोणतेही धोरण आम्ही बनवले नव्हते. दुग्धजन्य पदार्थ असल्याने आम्ही याबद्दल काहीही करू शकलो नाही. त्यामुळे ते फेकून द्यावे लागले. महाराष्ट्र सरकार केंद्र अगोदर लॉकडाऊन करेल असा आमचा विचारसुद्धा नव्हता.’

दरम्यान नॅचरलचे आईस्क्रीम ताज्या फळांच्या रसातून तयार होतात. त्यामुळे हे आईस्क्रीम राहण्याचा कालावधी १५ दिवसांचा असतो. महाराष्ट्राच्या लॉकडाऊननंतर काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर कंपनीने आईस्क्रीमचा कालावधी एक्सपायर होण्या अगोदर गरीब लोकांमध्ये वाटण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आणि पोलिसांकडे परवानगी मागितली. ज्यामध्ये आईस्क्रीम विकण्याकरिता वाहनांचा आवाज करण्यासाठी देखील अर्ज केला होता. परंतु प्रशासनाने केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस परवानगी देत होते. तसेच अत्यावश्यक वस्तूंमध्ये आईस्क्रीम येत नाही. त्यामुळे २६ टन आईस्क्रीम आता कुठे आणि कसे टाकता येईल ही समस्या कंपनी समोर निर्माण झाली होती. जास्त प्रमाणात आईस्क्रीम असल्यामुळे ते नाल्यात किंवा इतर कोठेही टाकले जाऊ शकले नाही. म्हणून कंपनीने संजीवनी S3 नावाच्या फर्मशी संपर्क साधला. ज्यांच्याकडे मुंबईत रेयर वेट डिस्पोजल प्लांट होता. या प्लांटमध्ये आईस्क्रीमची विल्हेवाट लावून बायोगॅसमध्ये रुपांतरित केले गेले. या २६ टन आईस्क्रीममुळे कंपनीचे तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले.


हेही वाचा – पहिल्याकडून उकळले कोटी, दुसऱ्याकडून लाखो, लग्न मात्र तिसऱ्याबरोबर